मुंबई : (Karachi Pakistan Blast) पाकिस्तानातील कराचीत सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. एका रहिवासी इमारतीत गुरुवारी १९ फेब्रुवारीला सकाळी ही घटना घडली. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर इमारतीचा मोठा भाग कोसळ्याने दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते.(Karachi Pakistan Blast)
पोलिसांनी दिली दुर्घटनेची माहिती
पहाटे साडेचारच्या सुमारास कराचीमधील सोल्जर बाझार परिसरातील एका रहिवासी इमारतीत ही घटना घडली. गुरुवारी रमजानचा महिना सुरु झाल्याने अनेक ठिकाणी पहाटेच्या सुमारास लोक जागे होते, अशी माहिती येथील पोलिस अधिकारी जमशेद अशहर यांनी माध्यमांनी दिली आहे. सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे हा स्फोट होऊन दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.(Karachi Pakistan Blast)
मृत आणि जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश
घटनास्थळी पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केल्यानंतर आत्तापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, जखमी १४ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून काहीजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे. नऊ ते सतरा वयोगटातील मुलांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेकजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.(Karachi Pakistan Blast)
यापूर्वीही मोठा अपघात
कराचीमध्ये गॅस टंचाईची समस्या वारंवार उद्भवते. त्यामुळे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या वस्त्यांमध्ये द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (LPG) सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अलीकडच्या काळातील हा दुसरा मोठा अपघात आहे. गेल्या महिन्यात सदर परिसरातील गुल शॉपिंग प्लाझाच्या तळघरात आग लागून किमान ७९ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.(Karachi Pakistan Blast)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\