India AI Impact summit 2026 : कॅन्सर उपचारात एआयची मदत, भाषेच्या संदर्भात मेटाच्या एआय ऑफिसरने केले भारताच्या प्रयत्नांचे कौतूक

    19-Feb-2026
Total Views |

India AI Impact summit 2026 Alexander Wang Speech
 
नवी दिल्ली (Alexander Wang) : आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या (एआय) विकासासाठी विश्वास, डेटा आणि कम्प्युटींग क्षमता भरपूर गरजेची आहे, असे प्रतिपादन मेटाचे मुख्य एआय ऑफिसर अलेग्जेंडर वांग यांनी केले. एआयच्या विश्वातील भारताच्या वाढत्या भूमिकेवर जोर दिला. इंडिया एआय इम्पॅक्ट समीट २०२६मध्ये ते बोलत होते. वांग म्हणाले, “क्षमता, उर्जा, डेटा आणि कम्प्युट हे एआयचे चार महत्वाचे स्तंभ आहेत.”, असेही ते म्हणाले.
 
आर्थिक गती मिळेल, अशा एआय योगदानाची गरज
 
सरकार आणि एआय उद्योग विश्वाला एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. एआय विश्वाने बाह्यशक्तींपेक्षा देशाची गरज लक्षात घेऊन क्षमता विकसित करण्याची ही वेळ आहे. त्यासाठी राष्ट्रीय एआय रणनितीची आवश्यकता आहे. ज्याद्वारे नवनिर्मतीला चालना मिळू शकेल. विनाकारण अडथळे निर्माण करत बसण्याची गरज नाही. तसेच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील लोकांनी समन्वय ठेवून आर्थिक विकासावर भर देईल, अशा नवनिर्मितीची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
  
समाजाची सेवा होईल, अशा टूलची निर्मिती
 
Alexander Wang म्हणाले, “मेटा ही एकमेव अशी कंपनी आहे ज्याकडे एआय रिसर्चमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संसाधन आणि प्रतिभा आहे. आम्ही असे तंत्रज्ञान विकसित करू इच्छितो की ज्याद्वारे समाजाची सेवा करू शकतो. मेटाकडे या तंत्रज्ञानाचा प्रभाव अब्जावधी जनतेपर्यंत पोहोचवू शकतो. ३.५ अब्ज लोक हे आज कुठल्या ना कुठल्या प्रकारे मेटाचा वापर करत आहेत. आता सोशल मीडिया रिल्स त्या त्या भाषांमध्ये आपल्याला पाहता येतात. त्यामुळे संवादाची अडचण दूर झाली आहे.”
 
कॅन्सर उपचारातही एआयची मदत
 
“भारतातील डेव्हलपर्स सामाजिक समस्यांसाठी एआय टूल विकसित करित आहेत. ज्यात अशोका विद्यापीठाचे उदाहरण घेता येईल. ज्यात वैज्ञानिकांनी सॅम ३ मॉडलच्या मदतीने कॅन्सर ट्यूमर आणि जोखीमग्रस्त अवयव कोणता हे शोधण्याची प्रक्रिया जलद केली. मेटाचे एक ओम्नी-लिंगुअल मॉडेलसुद्धा आहे, ज्यात सोळाशेहून अधिक भाषांची ओळख होऊ शकते. नव्या भाषेची ओळखही केली जाऊ शकते. पुढील काही वर्षांत एआय ट्रान्सलेशनद्वारे आपण कुठल्याही भाषेला कुठल्याही भाषेत ऐकू-बोलू शकतो, अशी स्थिती येईल. भारत सरकारसोबत आम्ही एआय कोच प्लॅटफॉर्मद्वारे सहकार्य करत आहोत. ज्यात १० प्रमुख भाषांमध्ये डेटा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ज्याद्वारे स्थानिक संदर्भातील मॉडेलचा विकास केला जाईल, असेही Alexander Wang म्हणाले.
 
सुरक्षा सर्वोच्च स्थानी
 
एआयच्या वापरात सुरक्षा ही सर्वोच्च स्थानी असायला हवी. आम्ही सुरक्षा समोर ठेवूनच कुठल्याही एआयटूलचा विकास करतो. हीच आमची प्रार्थमिकता आहे. कंपनी मॉडेलचा तपासणी, परिक्षण साच्यात सुधारणा आणि जोखीम व्यवस्थापनावरही काम करत आहे. ज्यात जोखमीचे आकलन, विशेषज्ञांद्वारे समीक्षा आणि अंतिम आवृत्तीपूर्वी सातत्याने कार्यरत आहे.