Malegaon Deputy Mayor Controversy : पुन्हा टिपूचा फोटो लावल्यास कर भरणार नाही; मालेगावच्या उपमहापौरांना हिंदू समाजाचा इशारा

...तर शहरात फिरू देणार नाही; दालनात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्याचे आवाहन

    19-Feb-2026
Total Views |
Malegaon Deputy Mayor Controversy
 
मुंबई : (Malegaon Deputy Mayor Controversy) मालेगावच्या उपमहापौरांनी दालनातील कामकाज झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो कार्यालयातील दुरुस्तीनंतर पुन्हा लावणार असल्याचे विधान केल्यानंतर ‌‘सकल हिंदू समाज‌’ आक्रमक झाला आहे. जर उपमहापौरांनी पुन्हा टिपूचा फोटो लावला, तर मालेगावातील हिंदू समाज महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा कर भरणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.(Malegaon Deputy Mayor Controversy)
 
मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्याबाहेर ‌‘सकल हिंदू समाजा‌’कडून आंदोलन करत सांगण्यात आले की, “लाखो हिंदूंच्या हत्या करणाऱ्या टिपूचा फोटो लावण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावावेत. त्यामुळे जर पुन्हा टिपूचा फोटो लावला, तर हिंदू कोणतीही करपट्टी भरणार नाहीत.” कार्यकर्ते म्हणाले की, “उपमहापौरांनी पुन्हा फोटो लावण्याचे कृत्य केले, तर त्यांना शहरात फिरू दिले जाणार नाही. मालेगावातील हिंदू समाज टिपू किंवा औरंगजेबाला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानतो. त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतानचा फोटो लागू दिला जाणार नाही.”(Malegaon Deputy Mayor Controversy)
 
हेही वाचा : Mumbai Climate Week 2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत ‘मुंबई क्लाइमेट वीक २०२६’चा दिमाखदार समारोप  
 
काय म्हणाले उपमहापौर?
 
काही दिवसांपूव उपमहापौर ‌‘शान-ए-हिंद‌’ निहाल अहमद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यावरून राज्यातील वातावरण पुरते ढवळून निघाले होते. त्यानंतर “दालनाचे दुरुस्तीचे काम चालू असल्याचे कारण देत फोटो काढण्यात आला. मात्र, काम झाल्यानंतर पुन्हा लावण्यात येईल,” असे उपमहापौरांनी सांगितले. या वक्तव्यामुळे सकल हिंदू समाज पुन्हा नाराज झाला आहे.(Malegaon Deputy Mayor Controversy)
 
उदात्तीकरणामुळे राज्यभर संताप
 
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानचा आदराथ उल्लेख करीत, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितले पाहिजे,” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते. ‌‘सकल हिंदू समाज‌’, अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी सपकाळ यांना चांगलेच धारेवर धरले होते. या संतापानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी जनतेची माफी मागितल्यानंतर हा वाद शमला होता.(Malegaon Deputy Mayor Controversy)