मुंबई : (Ex-UK Prince Andrew Mountbatten-Windsor arrested) ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू आणि ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली आहे. कथित 'एपस्टीन फाईल्स' मधील धक्कादायक खुलाशानंतर यूके पोलिसांनी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते वृत्तानुसार, अँड्र्यू यांना गुरुवारी सकाळी ८ वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.(Ex-UK Prince Andrew Mountbatten-Windsor arrested)
अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक झाल्यापासून प्रिन्स अँड्यू यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या फाईल्समध्ये प्रिन्स अँड्यू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्यांच्याकडून आधीच सर्व लष्करी पदव्या आणि राजघराण्यातील मानमरातब काढून घेण्यात आले होते. मात्र, आता त्यांना थेट अटक झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. (Ex-UK Prince Andrew Mountbatten-Windsor arrested)
अँड्र्यू यांची राजघराण्यातून हकालपट्टी
अँड्र्यू माउंटबॅटन हे ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचे दुसरे पुत्र आहेत. गेल्या वर्षी त्यांनी 'प्रिन्स' या पदवीसह इतर शाही पदव्या काढून घेण्यात आल्या त्यांना विंडसर पॅलेसमधील रॉयल लॉज सोडण्यास भाग पाडण्यात आले. मागच्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या एका चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. दोषी ठरवण्यात आलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबत अँड्र्यू माउंटबॅटन यांचे संबंध असल्याबाबत ही चर्चा होत होती.
(Ex-UK Prince Andrew Mountbatten-Windsor arrested)