Amrita Fadnavis: २३ वर्षांच्या सेवेनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट...

19 Feb 2026 19:24:57



Amrita Fadnavis 
मुंबई : (Amrita Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली. (Amrita Fadnavis)
 
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास वरिष्ठ उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचला. शाखा संचालन, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी, ग्राहक संबंध आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी प्रभावी नेतृत्व करत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. (Amrita Fadnavis)
 
हेही वाचा:  Mumbai Climate Week 2026: पर्यावरण रक्षणासोबत कृषी क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करावे; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन

 
सोशल मीडियावरील भावनिक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, २३ वर्षांपूर्वी, मी अॅक्सिस बँकेत एक तरुण व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला. आज, मी कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहे. शाखा कामकाजापासून कॉर्पोरेट बँकिंगपर्यंत, ट्रेझरीपासून ग्राहक संबंधांपर्यंतच्या अनुभवासह, ही संस्था माझे कुटुंब, शिक्षक आणि दुसरे घर आहे. माझ्या सहकाऱ्यांचा, विशेषतः एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचा, सर्व पाठिंब्यासाठी आभारी आहे. हा सुंदर अध्याय संपत असताना, मी आयुष्यभराचे धडे आणि मैत्री घेऊन जात आहे. धन्यवाद. (Amrita Fadnavis)
 

बँकिंग क्षेत्राबरोबरच अमृता फडणवीस या सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गायन क्षेत्रातही सक्रिय आहेत. पुढील काळात त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत राहणार याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर त्या रोखठोक भूमिका मांडत असल्याने त्यांच्या वक्तव्यांचीही नेहमीच चर्चा होत असते. (Amrita Fadnavis)
 

 
Powered By Sangraha 9.0