मुंबई : (Vivek Bhimanwar) भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी अध्यक्ष रजनीश सेठ, कार्यवाहू अध्यक्ष डॉ. अभय वाघ, आयोगाचे सदस्य, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.(Vivek Bhimanwar)
विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांची नियुक्ती सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाची ६२ वर्षे पूर्ण करेपर्यंत करण्यात आली आहे. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विवेक भीमनवार यांच्या नियुक्तीची सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना वाचली. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तर समारोप वंदेमातरम आणि राष्ट्रगीताने झाला.(Vivek Bhimanwar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....