Mumbai Climate Week 2026 : मुंबई क्लायमेट वीक २०२६: तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हवामान संवाद सत्रात सहभाग, हरित उपक्रमांचा आढावा

    18-Feb-2026
Total Views |
Mumbai Climate Week 2026
 
मुंबई: (Mumbai Climate Week 2026) मुंबई क्लायमेट वीक २०२६ (Mumbai Climate Week 2026) च्या दुसऱ्या दिवशी (१८ फेब्रुवारी) तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हवामान संवाद सत्रात भाग घेतला. जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या या व्यासपीठाने ग्लोबल साऊथसाठी नागरिक-केंद्रित हवामान कृतींवर भर दिला.(Mumbai Climate Week 2026)
 
उपनगर राज्य हवामान कृती वाढवण्या संबंधित विषयांवर झालेल्या या सत्रात तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह केनियाच्या खासदार चॅरिटी कथंबी चेपक्वोनी आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी हे देखील सहभागी झाले.(Mumbai Climate Week 2026)
 
हेही वाचा : Mumbai Climate Week : देशातील पहिला ‘मुंबई क्लाइमेट वीक’ सुरू
 
रेवंत रेड्डी यांनी हैदराबादच्या हरित प्रगतीचे उदाहरण दिले. कोरोना काळातील शहरी नियोजन आणि कचरा व्यवस्थापनेवरही त्यांनी भाष्य केले. त्यासोबतच, हायड्रा प्रकल्पांतर्गत ७५ तलावे पुनर्स्थापित करून स्थलांतरित पक्ष्यांना परत आणले, तर कृषीमध्ये सौर ऊर्जा एकीकरण आणि ३,००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसद्वारे तेलंगणातील प्रदूषण नियंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.(Mumbai Climate Week 2026)
 
केनियाच्या खासदार चॅरिटी कथंबी चेपक्वोनी यांनी कृषी तज्ज्ञ म्हणून सामुदायिक कृषी विकास प्रयत्नांचा उल्लेख केला. तर, नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी 'विकसित भारत आणि नेट झीरो' अहवालाचा संदर्भ देत शाश्वतता आर्थिक सुरक्षेशी जोडली. स्पष्ट धोरणे, कमी खर्चिक उपाय आणि कृषीतील हवामान धोरणे उपनगर राज्य कृती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.(Mumbai Climate Week 2026)