Pune Budhwar Peth Raid : पुण्यात ११ बांगलादेशी महिलांवर गुन्हा दाखल

पुणे पोलिसांचा बुधवार पेठेतील कुंटणखान्यामध्ये छापा

Total Views |
Pune Budhwar Peth Raid
 
मुंबई : (Pune Budhwar Peth Raid) पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांनी मंगळवारी रात्री दि. १७ रोजी छापेमारी करत कुंटणखान्यामध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली.(Pune Budhwar Peth Raid) या कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय करत असलेल्या ११ बांगलादेशी महिला सापडल्या आहेत. पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Budhwar Peth Raid)
 
पोलिसांनी राबवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये थेट बांगलादेशी महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरले. संपूर्ण कारवाईची प्रतिक्रिया पूर्ण करून या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.(Pune Budhwar Peth Raid)
 
या घटनेप्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, "बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली चालू असल्याचे निदर्शनात आले होते. त्यावर आम्ही कारवाई केली जाणार हे सांगितले होते. त्यानुसार कारवाई केली असून या कारवाईत ११ बांगलादेशी महिला सापडल्या असून एकूण २२ महिलांना ताब्यात घेतले आहे."(Pune Budhwar Peth Raid)
 
हेही वाचा : Maharashtra Maritime Board : राज्यातील सागरी व जलप्रवासी वाहतुकीला गती मिळणार
 
तेथील सर्व बेकायदेशीर इमारतींची तपासणी करून पुढे देखील कारवाई केली जाणार आहे. पोलिस दलाची सुरू असलेली कायदेशीर कारवाई गरज पडल्यास आणखी वाढवू. बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे. पिटा कायद्यांतर्गत करवाई सुरु आहे. जी कारवाई सुरू आहे ती नियमांच्या अधीन राहून सुरू आहे.(Pune Budhwar Peth Raid)
अमितेश कुमार
पोलिस आयुक्त, पुणे
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.