मुंबई : (Bhigwan Abduction Video Controversy) इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एका २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी दि. १७ रोजी घडली. या घटनेनंतर स्थानिकांकडून भिगवण पोलिसांत आंदोलन करण्यात आले. परंतु आता दिड दिवसांनंतर त्या युवतीचा एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये मी माझ्या मर्जीने गेल्याचे या व्हिडिओत ती सांगत आहे. मात्र, युवतीने हा व्हिडिओ कोणाच्या दबावातून बनवला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.(Bhigwan Abduction Video Controversy)
ते म्हणाले की, "मुलीचा जबरदस्तीने व्हिडीओ तयार करुन तो पोलीस अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात आहे. मी मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचे पुढच्या दोन चार दिवसात लग्न होतं. जबरदस्तीने मुलीचे अपहरण केले गेले. मी व्हिडीओ पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी सांगितले की हा व्हिडीओ पाठवण्यासाठी वेगळे अॅप वापरले ज्यात लोकेशन दिसत नाही."(Bhigwan Abduction Video Controversy)
ते पुढे म्हणाले की, "त्या युवकांनी युवतीचा व्हिडिओ पोलिसांना आणि घरच्यांना पाठवला. म्हणजे या मुलाला वाचवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे. त्याचे चुलते इथले गुंड आहेत. तेच या हिंदू मुलीच्या अपहरणामध्ये आरोपी आहे. पोलिसांना जर युवतीचा व्हिडिओ मिळत असेल तर ती युवती त्यांना शोधता येत नाही का, त्यामुळे लवकरात लवकर तिला तिच्या कुटुंबाकडे सोपवावे."(Bhigwan Abduction Video Controversy)
याबाबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती देताना सांगितलं की, अपहरणाची केस आमच्याकडे आली आहे, या अनुषंगाने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे. यामध्ये जे पीडिता आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचे समोर आले आहे. हे सर्व तपासामध्ये आढळले आहे.(Bhigwan Abduction Video Controversy)
मी या घटनेबरोबरच पोलिस प्रशासनाचा देखील निषेध करतो. कारण फक्त अपहरणच झालेले नाही तर हि घटना पूर्वनियोजित घडवून आणलेली घटना आहे. भिगवणमध्ये पोलिसांसमोर अशा प्रकारच्या घटना घडूनही पोलिस यामध्ये काही करू शकत नसतील तर ते प्रशासनाचे अपयश आहे. पोलिसांना विनंती आहे की, या प्रवृत्तींचा असा बंदोबस्त करा की, अशा घटनांचा तपास करण्याची वेळच तुमच्यावर येणार नाही.(Bhigwan Abduction Video Controversy)
संग्राम जगताप
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आतापर्यंत या प्रकरणात काय झालं?
- लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचे अपहरण करण्यात आले.
- रात्री मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला.
- रात्री पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
- पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवण बंदची हाक देण्यात आली.
- कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
- घटनेमुळे संतप्त झालेल्या सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला. यामध्ये आ. गोपीचंद पडळकर आणि आ. संग्राम जगताप सहभागी झाले.
- युवतीवर कोणाचा दबाव आहे, याची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.