Raj Thackeray Meets Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भेटीचं 'राज'कारण : नेमकी काय चर्चा झाली?

    18-Feb-2026   
Total Views |
 
Raj Thackeray MeetS Eknath Shinde
 
मुंबई : (Raj Thackeray Meets Eknath Shinde) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.(Raj Thackeray Meets Eknath Shinde) या दोघांमध्ये काही वेळ बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले.(Raj Thackeray Meets Eknath Shinde)
 
मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजप-शिवसेना महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत झाली. मात्र, निकालानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिवसेनेला पाठींबा दिला होता. यावरून उबाठा गटाने त्यांच्यावर टीकाही केली. दरम्यान, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.(Raj Thackeray Meets Eknath Shinde)
 
हेही वाचा : Pune Mundhwa Land Transaction Case : पुणे येथील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : महसुल मंत्र्यांकडे सीलबंद अहवाल सुपूर्द 
 
यावेळी दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली असून नंदनवन बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे राज ठाकरे यांनी विशेष कौतुक केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, निवडणूकांनंतरच्या घडामोडींनंतर झालेल्या या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.(Raj Thackeray Meets Eknath Shinde)
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....