_202602171543480803_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : ( Virat Kohli and Anushka Sharma ) टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी पहाटे वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. सकाळी सुमारे ६ वाजता त्यांनी महाराजांच्या आश्रमात भेट देत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी महाराजांशी आध्यात्मिक विषयावर सविस्तर चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट आणि अनुष्का हे स्थानिक रेडिसन हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी त्यांनी पहाटेच प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दाखल झाले होते. विराट आणि अनुष्काने याआधीही बऱ्यांचवेळा वृंदावनात प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले होते. पहिल्यांदा त्यांनी जानेवारी २०२३ मध्ये प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. वृंदावनातील त्यांच्या आश्रमात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
हेही वाचा : The Kerala Story 2 Trailer: "मेरा सलीम ऐसा नहीं है...", 'द केरला स्टोरी २’चा ट्रेलर प्रदर्शित! पुन्हा एकदा उलगडणार भयाण वास्तव
कोण आहेत प्रेमानंद महाराज?
प्रेमानंद महाराज यांचे खरे नाव अनिरुद्ध कुमार पांडे असुन त्यांचा जन्म कानपूरमध्ये रमा देवी आणि शंभू पांडे यांच्या पोटी झाला. तब्बल १३ व्या वर्षी त्यांनी संन्यासी होण्यासाठी घर सोडले होते. यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष वाराणसीमध्ये घालवला. प्रेमानंद महाराज हे ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज नावाच्या अत्यंत धोकादायक किडनी आजाराने ग्रस्त आहेत. इतक्या गंभीर आजारानंतरही, महाराज दररोज पायी चालत भक्तांमध्ये येतात आणि त्यांना सत्संग देतात, इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या किडनीचे नावही ठेवले आहे. एका व्हिडिओत त्यांनी त्यांच्या दोन किडनींना ‘राधा’ आणि ‘कृष्ण’ अशी नावे दिल्याचे सांगितले होते. त्यांच्या मते, देवाचा अंश आपल्या शरीरात आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे.