The Kerala Story 2 Trailer: "मेरा सलीम ऐसा नहीं है...", 'द केरला स्टोरी २’चा ट्रेलर प्रदर्शित! पुन्हा एकदा उलगडणार भयाण वास्तव

    17-Feb-2026   
Total Views |


The Kerala Story 2 Trailer

मुंबई : (The Kerala Story 2 Trailer) विपुल शाह निर्मित 'द केरला स्टोरी’२ : गोज बियॉन्ड' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून येत्या २७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर जितकी टीका झाली, तितकाच बॉक्स ऑफिसवर त्याला दमदार प्रतिसादसुद्धा मिळाला होता. त्यानंतर आता ‘द केरला स्टोरी २’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.(The Kerala Story 2 Trailer)


हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांचे कशा पद्धतीने धर्मांतर आणि शोषण केले जाते, हे ज्वलंत वास्तव कथेच्या केंद्रस्थानी आहे. यामध्ये कथेची अधिक गडद बाजू अधोरेखित करण्यात आली आहे. विविध राज्यांमधील हिंदू मुलींना लक्ष्य करून कशा पद्धतीने त्यांचे शोषण आणि धर्मांतर केले जाते, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. सत्य घटनांपासून प्रेरित ही कथा असल्याचे ट्रेलरच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे.(The Kerala Story 2 Trailer)


तीन राज्य, तीन कथा
 
“इन्शाल्लाह, अगले २५ साल में पुरा भारत एक इस्लामिक स्टेट होगा, और पुरे भारत में शरीया लागू होता...” या संवादानेच ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर कथा थेट राजस्थानमध्ये पोहोचते, जिथे एक हिंदू कुटुंब त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात पोक्सो तक्रार दाखल करण्यासाठी जाते. यातून पालकांचे दुःख आणि असहाय्यता दिसून येते.(The Kerala Story 2 Trailer)


त्यानंतर कथा मध्य प्रदेशकडे वळते. जिथे एका तरुण हिंदू महिलेची फसवणूक करून तिला लग्नासाठी प्रलोभन दिले जाते आणि नंतर तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जाते. नंतर कशा पद्धतीने तिचा विश्वासघात होतो आणि तिचं शोषण केलं जातं, याचं भीषण वास्तव दाखवण्यात आलं आहे.(The Kerala Story 2 Trailer)


तिसरी कथा प्रेक्षकांना पुन्हा केरळमध्ये घेऊन जाते. एक मुस्लीम पुरुष त्याच्या हिंदू प्रेयसीला लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रस्ताव देतो. परंतु जेव्हा ती ठामपणे सांगते की, ती धर्मांतर करणार नाही, तेव्हा परिस्थिती बदलते. धर्मांतराच्या जाळ्यात अडकवून तरुण मुलींचा जो छळ केला जातो, त्याची अंगावर काटा आणणारी झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. एका दृश्यात एका हिंदू मुलीला जबरदस्तीने गोमांस खायला दिले जात असल्याचे दाखवले आहे.(The Kerala Story 2 Trailer)


कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या भूमिका आहेत. मुस्लीम तरुणांच्या प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येते, त्याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.(The Kerala Story 2 Trailer)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\