मुंबई : (Bharat Hindu Samaj) भारत हिंदू समाजाने (Bharat Hindu Samaj) केलेल्या आरोपानुसार, पीटरबरो सिटी कौन्सिलच्या कॅबिनेटच्या निर्णयानंतर शहरातील एकमेव हिंदू मंदिर आणि सामुदायिक केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशी माहिती आहे की, त्या जागेचा ताबा एका मुस्लिम संस्थेला दिला जाऊ शकतो. मंदिराची जागा खरेदी करण्याचा त्यांचा दुसरा प्रयत्नही अपयशी ठरल्यानंतर भक्तांना संभाव्य बेदखलीचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. हिंदू समुदायाने मंदिर वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदतीची विनंती केली आहे.(Bharat Hindu Samaj)
पीटरबरो सिटी कौन्सिलच्या कॅबिनेटने नुकत्याच झालेल्या बैठकीत आपला अर्थसंकल्प संतुलित करण्यासाठी या ठिकाणाची विक्री एका अज्ञात बोलीदाराला करण्यास सहमती दर्शवली. हे केंद्र गेल्या ४० वर्षांपासून पूजा, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे प्रमुख ठिकाण राहिले असून ३५–४० मैलांच्या परिसरात हेच एकमेव हिंदू मंदिर आहे.(Bharat Hindu Samaj)
भारत हिंदू समाजाचा (Bharat Hindu Samaj) आरोप आहे की, समानता, अल्पसंख्याक हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा फक्त जमीन किंवा इमारतीचा प्रश्न नसून सन्मान, श्रद्धा आणि समान हक्कांचा प्रश्न आहे. आपल्या मंदिराचे आणि पूजा करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याची घोषणा संस्थेने केली आहे.(Bharat Hindu Samaj)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक