Macron India visit : भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय! पंतप्रधान मोदी मुंबई दौ-यावर; मोदी-मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा

17 Feb 2026 11:45:13

Macron India visit

मुंबई : (Macron India visit) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळासह सोमवारी रात्री उशिरा मुंबईत आगमन झाले. यावेळी विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी देखील राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधावर बैठक होणार आहे.(Macron India visit)

पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून एआय इम्पॅक्ट परिषदेत भाग घेण्यासाठी तसेच मुंबईत मोदी यांच्यासह द्विपक्षीय परिषदेत सहभाग घेण्यासाठी मॅक्रॉन भारत दौऱ्यावर आले आहेत. मॅक्रॉन यांची ही भारताची चौथी तर मुंबईची पहिलीच भेट आहे. दोन्ही नेते दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व इंडो-पॅसिफिक सहकार्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे.(Macron India visit)

मुंबईत लोकभवन येथे हे दोन्ही नेते भारत-फ्रान्सच्या धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतील आणि नवोन्मेष, उदयोन्मुख क्षेत्रात सहयोग कसा वाढवता येईल यावर चर्चा करतील. तसेच स्थानिक आणि जागतिक महत्वाच्या बाबींवर परस्परांचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा उद्देश असेल. संध्याकाळी ते भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष २०२६ चे उद्घाटन करतील. दोन्ही देशांमधील व्यावसायिक-उद्योगपती, स्टार्टअप्स, शास्त्रज्ञ यांना ते संबोधित करतील.(Macron India visit)



Powered By Sangraha 9.0