Ayodhya Shri Ram Temple : श्रीराम मंदिर निर्माणामुळे अयोध्येवर लक्ष्मीकृपा!

अयोध्येच्या परिस्थितीचा तुलनात्मक अहवाल ‘आयआयएम लखनौ’कडून प्रसिद्ध, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंदिर अर्थव्यवस्था प्रारुपावर शिक्कामोर्तब

    17-Feb-2026
Total Views |
Ayodhya Shri Ram Temple
 
मुंबई : (Ayodhya Shri Ram Temple) राम मंदिराच्या (Ayodhya Shri Ram Temple) निर्माणानंतर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आली असून, ‘आयआयएम लखनौ’ यांच्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येच्या चेहरामोहराच बदलला असून, पर्यटन, गुंतवणूक, रोजगार अशा सर्वच क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.(Ayodhya Shri Ram Temple)
 
केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या समन्वयाने राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर, अयोध्येत आर्थिक भरभराट झाली असल्याचा अहवाल ‘आयआयएम लखनौ’ यांनी नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये मंदिर निर्माणाच्या आधीची अयोध्येची स्थिती आणि नंतरची स्थिती याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. अहवालातील निरीक्षणानुसार मंदिर निर्माणापूर्वी अयोध्येची ओळख एक पवित्र तीर्थक्षेत्र एवढीच मर्यादित होती, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अयोध्येला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र म्हणूनही ओळख मिळवून देण्यात रालोआ सरकारला यश आले आहे. मंदिर निर्माणानंतर अयोध्येतून होणार्‍या कर संकलनामध्ये वृद्धी होताना, हा कर महसूल अंदाजे 20 हजार ते 25 हजारच्या आसपास असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.(Ayodhya Shri Ram Temple)
 
तसेच, श्रीरामांच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांच्या संख्येतही वाढ झाल्याने, त्याच्यावर आधारित असलेल्या हॉटेल क्षेत्र, होमस्टे, खानावळी यांची संख्या वाढली आहे. तसेच, काही नामांकित हॉटेल्स कंपन्यांनी साखळी पद्धतीने त्यांच्या व्यवसायाचा विस्तार अयोध्येत करण्यात सुरुवात केल्याने, उत्तर प्रदेशमधील तरुणांना रोजगार मिळाले आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा लाभ अयोध्येतील स्थानिक हस्तकला आणि धार्मिक मूर्तींकारांना होऊन, त्यांच्या उत्पादनाच्या मागणीत वाढ झाल्याने कारागीरांनाही थेट फायदा झाल्याचे निरीक्षण अहवालामध्ये नोंदवण्यात आले आहे.(Ayodhya Shri Ram Temple)
 
मंदिर (Ayodhya Shri Ram Temple) निर्माणाच्या आधी अयोध्येत दरवर्षी पर्यटकांची संख्या सुमारे 1.7 लाखाच्या आसपास होती. स्थानिक बाजारपेठांमधील उलाढालही किरकोळ स्वरुपाची असून, बहुतेक दुकानदारांचे सरासरी दैनिक उत्पन्न 400-500 रुपयांपर्यंतच मर्यादित असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच, मोठ्या हॉटेल साखळ्यांची उपस्थिती जवळजवळ नगण्यच होती. त्यामुळे मर्यादित रोजगाराच्या संधींमुळे तरुणांचे मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर झाल्याचे निरीक्षणही अहवालामध्ये नोंदवण्यात आले आहे.(Ayodhya Shri Ram Temple)
 
दरम्यान, आता दरवर्षी अयोध्येत 50-60 कोटी पर्यटक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, सध्या अयोध्या देशातील प्रमुख धार्मिक-पर्यटन स्थळांमध्ये आघाडीवर आहे. अयोध्येत अंदाजे 85 हजार कोटी रुपयांचे पुनर्विकास प्रकल्प प्रगतीच्या विविध टप्प्यात आहेत. त्यांचा प्रभाव गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रांवरही पडतो आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, आधुनिक रेल्वे स्टेशन, वाढते रस्त्यांचे जाळे आणि शहराचे सौंदर्यीकरण प्रकल्प यासह, विविध पायाभूत सुविधा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा यासारख्या उपक्रमांनाही सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. अयोध्या मॉडेल सोलर सिटी म्हणून विकसित करण्याच्या दिशेने उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. अयोध्येच्या विकसामुळे आयआयएम लखनौ या संस्थेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंदिर अर्थव्यवस्था प्रारुपावर शिक्कामोर्तब केले आहे.(Ayodhya Shri Ram Temple)
 
श्रीराम मंदिर निर्माणानंतर अयोध्येतील समृद्धीचे पर्व :
 
- राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेने देशात एक लाख कोटींपेक्षा अधिक उलाढाल
 
- अयोध्येत दर्शनासाठी दररोज येणार्‍या भाविकांची संख्या दोन लाखांच्या वर
 
- अयोध्येत 150 हॉटेल्स आणि होमस्टे नव्याने सुरु
 
- सहा हजार लघु आणि सुक्ष्म उद्योगांची नव्याने सुरुवात
 
- किरकोळ विक्रेत्यांचे दर दिवासाचे उत्पन्न 400 वरून 2500 वर
 
- पुढील 5 वर्षात 1.2 लाख प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचा अंदाज
 
- ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर अयोध्येसाठी बुकिंग चार पटीने वाढलेे.