Country's Tallest Hanuman Statue : कोराडी येथे देशातील सर्वात उंच १५८ फूट हनुमान मूर्तीचे लवकरच लोकार्पण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित
17-Feb-2026
Total Views |
नागपूर : (Country's Tallest Hanuman Statue) नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील मंदिर परिसरात देशातील सर्वात उंच, तब्बल १५८ फूट उंचीची भगवान श्री हनुमान यांची भव्य मूर्ती साकारली जात आहे. श्रद्धा, शक्ती, भक्ती आणि भारतीय सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असलेला हा दिव्य प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात असून, त्याचा लोकार्पण सोहळा लवकरच भव्य आणि दिमाखदार स्वरूपात पार पडणार आहे.(Country's Tallest Hanuman Statue)
या ऐतिहासिक व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती लाभणार आहे. यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना औपचारिक निमंत्रण दिले. अमित शाह यांनी अत्यंत आत्मीयतेने हे निमंत्रण स्वीकारले असून, जून महिन्यात लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी वेळ देण्याची तयारी दर्शवली आहे.(Country's Tallest Hanuman Statue)
कोराडी येथे उभारली जात असलेली ही भव्य हनुमान मूर्ती केवळ धार्मिकच नव्हे, तर वास्तुकलेचा अद्भुत नमुना ठरणार आहे. या मूर्तीमुळे कोराडी परिसराचे धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असून, देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगाराच्या संधी तसेच सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे.(Country's Tallest Hanuman Statue)
भगवान श्री हनुमानांच्या कृपेने हा लोकार्पण सोहळा भक्तिमय, उत्साहपूर्ण व यशस्वीपणे पार पडावा, तसेच कोराडीचे हे पवित्र आध्यात्मिक स्थळ देशभरातील भाविकांसाठी श्रद्धा, शक्ती आणि प्रेरणास्थान ठरावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोराडी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र तसेच जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. यामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन नागपूर जिल्हा यांच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. भक्ती आणि तंत्रज्ञानाचा हा अपूर्व संगम कोराडी नगरीला नवी ओळख देणारा ठरणार आहे.(Country's Tallest Hanuman Statue)