Prasika's Social Media Accounts Got Suspended : ‘प्रसिका’जोडीला मोठा धक्का! प्रसाद-दीपिका वेदपाठक यांची सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स अचानक सस्पेंड

17 Feb 2026 18:05:18

Prasika
 

मुंबई : (Prasika's Social Media Accounts Got Suspended) सोशल मीडियावर ‘प्रसिका’ या नावाने लोकप्रिय असलेली प्रसाद आणि दीपिका वेदपाठक ही नवरा-बायकोची जोडी सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. त्यांच्या सर्व प्रमुख सोशल मीडिया अकाऊंट्सना अचानक सस्पेंड करण्यात आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. इन्स्टाग्राम आणि युट्यूबसह विविध प्लॅटफॉर्म्सवर खास पाककृतींचे व्हिडीओ शेअर करून त्यांनी मोठा चाहतावर्ग तयार केला होता. “नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या..” अशी प्रसाद व्हिडीओची सुरुवात करायचा, तर दीपिका तिच्या खास अंदाजात विविध पदार्थ बनवून दाखवायची. ‘आपलं मीठ’ हा तिचा डायलॉग विशेष लोकप्रिय ठरला होता. मात्र, ‘मेटा’कडून त्यांच्या अकाऊंट्सवर कारवाई का करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.(Prasika's Social Media Accounts Got Suspended)

 

हेही वाचा : विराट कोहली–अनुष्का शर्मा पुन्हा वृंदावनात; प्रेमानंद महाराजांचे घेतले दर्शन
 


या कारवाईबाबत प्रसादने माहिती देताना सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून ते प्रामाणिकपणे कंटेंट तयार करत आहेत आणि त्यांनी कधीही कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केलेले नाही. सर्व नियमांचे पालन करूनही अकाऊंट्स अचानक सस्पेंड करण्यात आल्याचे त्याने नमूद केले. (Prasika's Social Media Accounts Got Suspended) त्यांची सर्व अकाऊंट्स व्हेरिफाइड असून अनेक ब्रँड्स आणि क्लायंट्स सध्या प्रतीक्षेत आहेत. अकाऊंट्सचा अॅक्सेस नसल्यामुळे सुरू असलेले प्रोजेक्ट्स पूर्ण करता येत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. संबंधित प्लॅटफॉर्म्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी प्रसाद आणि दीपिका अकाऊंट्स पुन्हा सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नेटकऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत लवकरात लवकर अकाऊंट्स पुनर्संचयित करण्याची मागणी केली आहे.(Prasika's Social Media Accounts Got Suspended)
 



Powered By Sangraha 9.0