MHADA : अखेर प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या ११८ घरांसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" तत्त्वावरील घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी
16-Feb-2026
Total Views |
मुंबई : (MHADA) विशेष प्रतिनिधी म्हाडाच्या (MHADA) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील ११८ सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी म्हाडाच्या (MHADA) अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार आहे.(MHADA)
म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळामार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या (MHADA) अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.(MHADA)
'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर १२० सदनिका विक्री करण्यासाठी दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध वर्तमान पत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. त्यानुषंगाने दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्धिपत्रक देण्यात आले. सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होईल असे नमूद करण्यात आले होते. पंरतु, तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता नव्याने सदर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.(MHADA)
ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला दि. ०४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरुवात होणार आहे. सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.(MHADA)
'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर मंडळाने बांधलेल्या शिंपोली कांदिवली येथील ०८ सदनिका, चारकोप सेक्टर-८ कांदिवली येथील ०१ सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील २७ सदनिका, तुंगा पवई येथील ४२ सदनिका, पीएमजीपी मानखुर्द येथील ०१ सदनिका, मालवणी मालाड येथील ०१ सदनिका, गायकवाड नगर मालवणी-मालाड येथील ०१ सदनिका अशा ८२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.(MHADA)
तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(५) (७) ५८ अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या सदनिकांमधून घाटकोपर पूर्व येथील ०२ सदनिका, कन्नमवार नगर विक्रोळी येथील ०१ सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील ०८ सदनिका, भायखळा येथील ०६ सदनिका, ताडदेव येथील ०६ सदनिका, लोअर परळ येथील ०४ सदनिका, सायन येथील ०२ सदनिका, जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम येथील ०७ सदनिका अशा ३६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.(MHADA)
जाहिरातीमधील वेळोवेळी रिक्त सदनिकांचा तपशील ऑटोमॅटिक वेबसाईटवर दिसेल या अनुषंगाने अर्जदार अर्ज करू शकतील. अर्जदार यांना सर्व रकमा एनईएफटी/आरटीजीएस/नेट बँकिंग/यूपीआय/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणेच आवश्यक आहे.(MHADA)