मुंबई : (Tejas Thackeray health update) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून उपचार सुरू आहेत. उपचारानंतर आता त्यांना बरे वाटू लागल्याचे सांगितले जात आहे. (Tejas Thackeray health update)
दरम्यान, रुग्णालयात रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस ठाकरेंची प्रकृती सध्या नियंत्रणात आहे आणि कोणतीही गंभीर स्थिती नाही. डॉक्टर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Tejas Thackeray health update)
तेजस ठाकरे..... (Tejas Thackeray health update)
तेजस ठाकरे हे राजकीय कार्यक्रमांत अधूनमधून उपस्थित राहत असले, तरी त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नाही. ते वन्यजीव संशोधक आणि फोटोग्राफर म्हणून अधिक परिचित आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत तामिळनाडूत सापडलेल्या गेकोच्या नव्या प्रजातीला त्यांच्या नावाने ओळख देण्यात आली होती. (Tejas Thackeray health update)
२०१२ साली त्यांनी अंबोली येथे पहिली हर्पिंग ट्रिप घेतली होती. पुढे २०१७ मध्ये आवश्यक परवानग्या घेऊन त्यांनी ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ या माशाचे शास्त्रीय डॉक्युमेंटेशन पूर्ण केले. २०२१ मध्ये या संशोधनाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली. आतापर्यंत त्यांनी ६० हून अधिक प्रजाती शोधल्याची नोंद आहे. (Tejas Thackeray health update)