Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी सहा जणांना अटक! आरोपींची संख्या ११ वर

    16-Feb-2026   
Total Views |


Rohit Shetty Firing Case

मुंबई : (Rohit Shetty Firing Case)
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी सहा आरोपींना राजस्थानमधून अटक केली आहे. या सहाही जणांना मुंबईला आणले जात असून आतापर्यंत या प्रकरणात अकरा जणांना अटक झाली आहे.(Rohit Shetty Firing Case)


<!-- Inject Script Filtered -->

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या ‘शेट्टी टॉवर’ या निवासस्थानाबाहेर १ फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला होता. रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी त्याच्या घराबाहेर चार राऊंड फायर करण्यात आले होते. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला.(Rohit Shetty Firing Case)

याआधी पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट आणि आसाराम फसाळे या पाच जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचं पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्ल्यामागील नेमकं कारण आणि सूत्रधार कोण, याचा शोध घेतला जात आहे.(Rohit Shetty Firing Case)
 

 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\