Al Impact Summit 2026 : “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय”, पंतप्रधान मोदींकडून एआय समिटमधील पाहुण्यांचं स्वागत

16 Feb 2026 13:26:23

PM Narendra Modi

नवी दिल्ली : (PM Narendra modi on AI Impact Summit 2026)
भारत यजमानपद भूषवत असलेल्या 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६' या पाच दिवसीय शिखर परिषदेसाठी जगभरातील नेते, धोरणकर्ते, उद्योगधुरीण आणि नवोन्मेषक भारतात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत सर्वांचे स्वागत केले आहे. या शिखर परिषदेचं ब्रीद “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” असून एआयचा उपयोग मानवकेंद्रित प्रगतीसाठी व्हावा, ही सामायिक वचनबद्धता यातून अधोरेखित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.(PM Narendra modi on AI Impact Summit 2026)

काय म्हणाले पंतप्रधान ?

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर असलेल्या जागतिक नेत्यांचं परिषदेसाठी जगभरातून भारतात येत धोरणकर्त्यांचं उद्योगधुरीण, नवोन्मेषक आणि तंत्रज्ञानप्रेमींचं स्वागत आहे. या शिखर परिषदेचं ब्रीद सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय अर्थात सर्वांचं हित, सर्वांचं सुख आहे. एआयचा उपयोग मानवकेंद्रित प्रगतीसाठी व्हावा, याबाबतची सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, कृषी, शासन आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. ही शिखर परिषद नवोन्मेष, समन्वय आणि जबाबदार वापर अशा एआयच्या विविध पैलूंवर विचारविनिमयासाठी जगाला उपयुक्त ठरेल, अनेक संधी खुल्या करेल. भारत एआय परिवर्तनात अग्रस्थानी असल्याचा अभिमान व्यक्त करत पंतप्रधानांनी देशवासियांचे आभार मानले.(PM Narendra modi on AI Impact Summit 2026)

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांपासून ते गतिमान स्टार्टअप परिसंस्था आणि अद्यावत संशोधनात आपली एआयमधली पावलं महत्वाकांक्षा आणि जबाबदारी दोन्ही प्रतिबिंबित करत आहेत. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी जगभरातून लोक भारतात येत आहेत. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगानं प्रगती करत असून जागतिक विकासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.(PM Narendra modi on AI Impact Summit 2026)
Powered By Sangraha 9.0