नवी दिल्ली : (PM Modi inaugurates India AI Impact Expo 2026) नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सोमवार दि. १६ फेब्रुवारीपासून इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसादा हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी निवडक एआय स्टार्टअप्सची पाहणी केली.(PM Modi inaugurates India AI Impact Expo 2026)
इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो २०२६ हे २० फेब्रुवारीपर्यंत भारत मंडपम येथे सुरू राहणार आहे आणि इंडिया एआय इम्पॅक्ट समिटसोबत आयोजित केले गेले आहे. हा एक्स्पो प्रत्यक्ष कृतीत एआयचे राष्ट्रीय प्रदर्शन ठरणार असून, जिथे धोरण आणि अंमलबजावणी, नवोपक्रम आणि विस्तार, तसेच तंत्रज्ञान आणि सामान्य नागरिक यांची सांगड घातली जाणार आहे.(PM Modi inaugurates India AI Impact Expo 2026)
भारत मंडपम येथे आयोजित हा एक्स्पो ७१,००० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावर १० क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. या एक्स्पोमध्ये जागतिक तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार सहभागी झाले आहेत. एक्स्पोमध्ये १३ देशांचे पॅव्हिलियन आहेत, ज्यातून एआय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याची झलक पाहायला मिळते. यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आणि आफ्रिका यांचा समावेश आहे.(PM Modi inaugurates India AI Impact Expo 2026)
या एक्स्पोमध्ये ३०० पेक्षा जास्त प्रदर्शन पॅव्हिलियन आणि लाइव्ह डेमो आहेत. हे सर्व People (लोक), Planet (पर्यावरण) आणि Progress (प्रगती) या तीन विषयांवरील चक्रांभोवती साकारले गेले आहेत. एक्स्पोमध्ये ६०० हून अधिक उच्च-क्षमता असलेल्या स्टार्टअप्सचा समावेश आहे, ज्यापैकी अनेक जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण आणि जनहितासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या उपाययोजना विकसित करत आहेत. हे स्टार्टअप्स प्रत्यक्षात तैनात केलेल्या आणि वापरात असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करत आहेत.(PM Modi inaugurates India AI Impact Expo 2026)