मुंबई : (Himangi sakhi Shankaracharya) महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशाला पहिली ‘किन्नर शंकराचार्य’ मिळाली आहे. (Himangi sakhi Shankaracharya) माता वैष्णो किन्नर अखाड्याच्या प्रमुख आणि किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांची किन्नर शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोपाळ येथे आयोजित किन्नर धर्म संमेलनात त्यांचा पट्टाभिषेक करण्यात आला. तसेच राजस्थानातील धार्मिक नगरी पुष्कर येथे ‘किन्नर शंकराचार्य पीठ’ स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली. आता या पीठाची धुरा हिमांगी सखी सांभाळतील. कार्यक्रमादरम्यान किन्नर अखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास उपस्थित होते आणि सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. हा कार्यक्रम किन्नर वैष्णव अखाड्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.(Himangi sakhi Shankaracharya)
किन्नर महामंडलेश्वर आणि किन्नर वैष्णव अखाड्याच्या प्रमुख हिमांगी सखी मूळच्या मुंबईच्या रहिवासी आहेत. धार्मिक क्षेत्रात त्या परिचित व्यक्तिमत्त्व मानल्या जातात. त्यांच्या नावावर अनेक उपलब्धी आहेत. त्या ‘माता वैष्णो किन्नर अखाड्या’च्या प्रमुख असून जगातील पहिल्या ‘किन्नर भागवत कथा वाचक’ म्हणूनही ओळखल्या जातात. त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म आणि किन्नर समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवत आल्या आहेत.(Himangi sakhi Shankaracharya)
या भव्य धार्मिक कार्यक्रमात देशभरातील संत-महात्मे आणि किन्नर समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वैदिक मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या वातावरणात झालेल्या या पट्टाभिषेकाला किन्नर समाजाला हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या महत्त्वपूर्ण अभियानाचा भाग मानले जात आहे.(Himangi sakhi Shankaracharya)
६० हून अधिक किन्नरांची ‘घरवापसी’
भोपालमधील किन्नर धर्म संमेलनात किन्नर शंकराचार्य (Himangi sakhi Shankaracharya) नियुक्तीव्यतिरिक्त आणखी एक मोठा दावा करण्यात आला. ६० पेक्षा अधिक किन्नरांनी हिंदू धर्मात ‘घरवापसी’ केल्याचे सांगण्यात आले. आयोजक आणि किन्नर जूना अखाड्याच्या प्रमुख डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत धर्मांतर केलेल्या ६० किन्नरांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्याची माहिती देण्यात आली. मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या या किन्नरांची वैदिक विधी आणि शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे ‘घरवापसी’ करण्यात आल्याचे मंचावरून जाहीर करण्यात आले.(Himangi sakhi Shankaracharya)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक