नवी दिल्ली : (UGC) युजीसीच्या नवीन नियमांवरून देशातील वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून आले. दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये १३ फेब्रुवारीला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकारावर तिथल्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘ब्रेकिंग ओपिनियन’ या यू ट्यूब चॅनलच्या पत्रकार रूची तिवारी ही रिपोर्टींग करण्यासाठी गेली होती. यावेळी रिपोर्टिंग करत असताना सुमारे ५०-१०० लोकांच्या जमावाने तिला घेरले. तिच्यावर हल्ला केला आणि आणि धमकावण्याचा प्रयत्न केला.(UGC)
रुची तिवारी हिच्या म्हणण्यानुसार, तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकारानेच तिला नाव विचारलं. तिचं आडनाव तिवारी आहे हे समजताच जमावातील काही जण "ही ब्राह्मण आहे, पकडा तिला" असं म्हणत तिच्या दिशेनं धावून गेले. रुचीने पुढे सांगितले की, तिला निर्वस्त्र करुन धिंड काढू तसेच अत्याचाराची धमकी दिली गेली. “केवळ मी ब्राह्मण आहे म्हणून त्यांनी मला लक्ष्य केले.” गर्दीतून आवाज येत होते, “ही ब्राह्मण आहे, हिला पकडा, हिचे कपडे फाडा, हिचे कपडे काढा.” जातीवरून आपल्याला लक्ष्य करण्यात आले असं रुचीने म्हटले आहे. "एका महिलेला मारहाण केली जात असताना तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. तिचे कपडे फाडण्याची भाषा केली जाते आणि प्रत्यक्षात तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा गर्दीत उपस्थित पुरुष पुढे येऊन ते थांबवण्याऐवजी व्हिडिओ शूट करतात. हा कुठला स्त्रीवाद आहे?", असा संतप्त सवाल तिने उपस्थित केला आहे.(UGC)
हे आंदोलन ‘भारतीय विद्यार्थी महासंघ’, ‘अखिल भारतीय विद्यार्थी संघटना’ आणि ‘ऑल इंडिया फोरम फॉर इक्विटी’ या साम्यवादी विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रकरणी एफआयआर दाखल झाली असून पोलिस तपास सुरू आहे. या घटनेमुळे पत्रकारांची सुरक्षा, कॅम्पसमधील वातावरण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
(UGC)