Standing Committee : स्थायी समिती अध्यक्षासाठी भाजपा नगरसेवकांमध्ये उत्सुकता

    16-Feb-2026
Total Views |
Standing Committee
 
मुंबई : (Standing Committee) स्थायी समिती भाजपाला मिळण्याची शक्यता असल्यामुळे समितीवर नियुक्ती झालेल्या सदस्यांपैकी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत भाजपा नगरसेवकांमध्ये उत्कंठा वाढली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपा ज्येष्ठ नगरसेवकाचा विचार करणार की, नव्या नगरसेवकाचा विचार करणार हे येत्या बुधवारी स्पष्ट होणार आहे. (Standing Committee)
 
स्थायी समितीच्या  (Standing Committee) सदस्य पदी २६ नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात भाजपाच्या १० नगरसेवकांचा समावेश आहे. यात ज्येष्ठ नेते प्रभाकर शिंदे, गणेश खणकर राखी जाधव, ॲड. मकरंद नार्वेकर, हरीश भांगिर्डे, शितल गंभीर, प्रकाश दरेकर, तिवाना सतनाम सिंग, प्रीती सातम व शिवकुमार झा यांचा समावेश आहे. यात गणेश खणकर हे सभागृह नेते झाल्यामुळे त्यांना स्थायी समिती  (Standing Committee) अध्यक्ष पद मिळणार नाही. पण समितीचे अध्यक्ष पदासाठी प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश भांगिर्डे, शितल गंभीर, प्रकाश दरेकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निश्चित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवलेल्या नगरसेवकाची समितीचे अध्यक्षपदी वर्णी लागेल, असे भाजपा कडून सांगण्यात येत आहे. (Standing Committee)
 
स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवार २० फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी १८ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे १८ फेब्रुवारीलाच स्थायी समितीचे अध्यक्ष कोण, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून महापौर व उपमहापौर निवडणुकीप्रमाणे विरोधी पक्ष माघार घेणार की उमेदवारी अर्ज दाखल करणार याबाबत अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ठरले नसल्याचे समजते. परंतु ही निवडणूक बिनविरोध करायला ठाकरे सेना तयार होणार नसल्याचे बोलले जात आहे. (Standing Committee)
 
हेही वाचा : अजित पवार यांच्या मृत्यूवर संशय; रोहित पवार खासगी तपासाच्या तयारीत? सविस्तर जाणून घ्या... 
 
स्थायी समितीतून पेडणेकर दूर
 
मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या (Standing Committee) सदस्य पदी विरोधी पक्षनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र मातोश्रीच्या आदेशानुसार त्यांना समिती सदस्य पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. पेडणेकर यांच्या विरोधात कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मुख्य समितीपासून दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पेडणेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे स्थायी समितीची जबाबदारी माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यावर राहणार आहे. (Standing Committee)
 
यामिनी जाधव स्थायी समितीवर
 
माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना शिवसेनेने स्थायी समितीचे सदस्य पद दिले आहे.
 
स्थायी समितीतील पक्षनिहाय सदस्य
 
भाजपा - १०
 
शिवसेना (उबाठा) - ७
 
शिवसेना - ४
 
काँग्रेस - ३
 
मनसे - १
 
एमआयआय - १