A.R. Rahman : ४० दिवसांचा सोशल मीडिया ब्रेक! ए.आर. रहमान यांची घोषणा, चाहत्यांमध्ये चर्चा

16 Feb 2026 15:34:40

A.R. Rahman
मुंबई : (A.R. Rahman) जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले संगीतकार ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांनी अलीकडेच सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याने इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सतत ऑनलाइन आणि कनेक्टेड राहण्याच्या या काळात रहमान यांचा हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मपासून दूर जाण्याचा त्यांचा निर्णय हा केवळ एका सेलिब्रिटीचा वैयक्तिक ब्रेक नसून, आजच्या हायपरकनेक्टिव्ह जगात सोशल मीडिया डिटॉक्सची वाढती गरज अधोरेखित करणारा मानला जात आहे.(A.R. Rahman)
'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी चेन्नईमध्ये ‘वंडरमेंट टूर’ बॅनरखाली रहमान (A.R. Rahman) यांनी चाहत्यांसाठी एक मोठा संगीतमय कार्यक्रम सादर केला. या लाईव्ह शोला ३०,००० हून अधिक चाहत्यांनी उपस्थिती लावली असून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या कारकिर्दीतील काही सर्वात लोकप्रिय आणि गाजलेल्या रचना सादर करत त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.(A.R. Rahman)
 
या कार्यक्रमात ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र ए.आर. अमीन यांच्यासह गायक श्रीनिवास, चिन्मयी श्रीपाद, आदित्य आरके आणि रक्षिता सुरेश यांनीही स्टेजवर परफॉर्म करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. 
 
ए.आर. रहमान यांच्या सोशल मीडिया ब्रेक मागचं नेमकं कारण काय? 
या कार्यक्रमानंतर, रहमान (A.R. Rahman) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करत सोशल मीडिया ब्रेकची घोषणा केली. त्यांनी लिहिले, “मी पुढील ४० दिवसांसाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यापूर्वी... हा साइन ऑफ करण्याचा एक चांगला मार्ग आहे.” या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक चाहत्यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.(A.R. Rahman) 
 
रहमान यांनी हा ब्रेक का घेतला, याबाबत त्यांनी थेट कारण स्पष्ट केले नसले तरी, काही सूत्रांच्या मते ते काही काळ स्वतःसाठी, आध्यात्मिक चिंतनासाठी आणि नव्या संगीत निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे. सततच्या डिजिटल गडबडीतून दूर राहून मन शांत ठेवणे आणि सर्जनशीलतेला अधिक वाव देणे, हा या ब्रेकमागचा उद्देश मानला जात आहे. 
 
हेही वाचा : Al Impact Summit 2026 : “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय”, पंतप्रधान मोदींकडून एआय समिटमधील पाहुण्यांचं स्वागत  
आता पुढील ४० दिवस ए.आर. रहमान (A.R. Rahman) सोशल मीडियावर दिसणार नसले, तरी त्यांच्या सुरांची जादू मात्र चाहत्यांच्या मनात कायम गुंजत राहणार आहे. डिजिटल जगातून घेतलेला हा छोटासा विराम कदाचित नव्या सांगीतिक प्रवासाची नांदी ठरेल आणि ४० दिवसांनंतर ए.आर. रहमान पुन्हा एकदा नव्या उर्जेसह, नव्या सुरांसह चाहत्यांसमोर येतील, अशीच सर्वांना उत्सुकता आहे.(A.R. Rahman)
 
Powered By Sangraha 9.0