मुंबई : (Harshvardhan Sapkal) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतान याचा आदरार्थी उल्लेख करत "टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे", असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपतर्फे निषेध मोर्चे करत सपकाळांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.(Harshvardhan Sapkal)
पुण्यातील काँग्रेस भवनासमोर पतीत पावन संघटनेने आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या बॅनरला काळे देखील फासण्यात आले. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून महापौर मंजूषा नागपूरे आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.(Harshvardhan Sapkal)
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर भारतीय जनता युवा मोर्चाकडून सपकाळांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, "हर्षवर्धन सपकाळांनी (Harshvardhan Sapkal) राज्याची माफी मागितली पाहिजे. आज त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करत आहोत, उद्या वेळ पडली तर मुंबईत आल्यावर त्यांनादेखील जोडे मारू".(Harshvardhan Sapkal)
पुण्यातील काँग्रेस भवनासमोरील मोर्चादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने काही कार्यकर्त्यांसह दोन पोलिस जखमी झाले आहेत. अधिक तणाव वाढू नये म्हणून सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.(Harshvardhan Sapkal)
हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट चर्चेत
पुण्यातील भाजप-काँग्रेस राड्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून देवेंद्र फडणविसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असे वक्तव्य सपकाळ यांनी केले.(Harshvardhan Sapkal)
हेही वाचा : Kisan Kathore: मुरबाड मधील शिवमंदिरात आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पूजा अर्चा
इस्लाम पार्टीकडून समर्थन
हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी अभ्यास करूनच स्टेटमेंट दिले असेल तर हरकत काय? असे मत मालेगावातील इस्लाम पार्टीचे असिफ शेख यांनी व्यक्त करत सपकाळ यांची पाठराखण केली.
राहुल गांधींनी तातडीने हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घ्यावा- चंद्रशेखर बावनकुळे
हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांना काही संवेदना असतील तर राहुल गांधींनी तातडीने हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
सावरकर, कोश्यारींचे पुतळे जाळणार का? - हर्षवर्धन सपकाळ
वर्धा येथे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सावरकरांनी देखील शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. भगतसिंग कोश्यारी हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले, त्यांचे पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न मला उपस्थित करायचा आहे.
टिपू सुलतानने भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बलिदान दिले. टिपू सुलतानच्या मृतदेहाजवळ राम लिहिलेली सोन्याची अंगठी सापडली होती. ही अंगठी २०१४ रोजी ब्रिटनमध्ये १४ हजार ४०० पाउंडला लिलावात विकली गेली. टिपूने तुरुंगातून सावरकरांसारखी माफीची पत्रे लिहिली नाहीत.(Harshvardhan Sapkal)
असदुद्दीन ओवैसी
लोकसभा खासदार
टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात.. ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिरे तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले.. तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही! काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्याचे लावून दाखवावे मग बघू शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात कसे फिरू देतात! हर हर महादेव !(Harshvardhan Sapkal)
नितेश राणे
मस्त्योद्योग व बंदरे विकास मंत्री