उल्हासनगरात दोन दिवशीय बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन...

    15-Feb-2026
Total Views |

उल्हासनगर: बुध्द विहार समन्वय समीतीच्या वतीने उल्हासनगर शहरात 28 फ्रेबुवारी व 1 मार्च 2026 असे दोन दिवशीय ऐतिहासिक बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असुन या अधिवेशनात देशभरातुन बौध्द भिक्खू संघ व विचारवंत उपस्थित राहुन मौलिक असे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती या अधिवेशनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

ऐतिहासीक बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगर येथील शहीद जनरल कुमार वैद्य सभागृह (टाऊन हाँल) उल्हासनगर नंबर 03 येथे संपन्न होणार आहे.यावेळी देशभरातुन बौध्द भिक्कु संघासह बौध्द अभ्यासक,पाली भाषेचे अभ्यासक यांच्या सह विविध क्षेत्रातील विचारवंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.डॉ.भदंत उपगुप्त महास्थविर (पभरणी)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असुन अधिवेशनाचे उद्घाटक कामगार नेते शामदादा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणुन भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर हे असुन स्वागताध्यक्ष डॉ.चंद्रकांत साळवे हे राहणार आहेत.

सदर अधिवेशनात विविध जागतीक बौध्द विषयावर सखोल चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.महेंद्र बुध्दरत्न (बारसागडे),डॉ.उल्हास आंबेडकर,मेहराताई गायकवाड, आय.एम.मोरे,दिंगंबर हजारे,नवनाथ दिपके,सीमाताई खैरनार,धर्मदास डवले,सदानंद जाधव,अशोक पंडागळे,सिध्दार्थ साळवे व पारीसनाथ जगताप हे नियोजन समीतीचे पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याची माहिती बुध्द विहीर समन्वय समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौध्द यांनी आज समतानगर ऩबर 02,मैत्रेय बुध्द विहार,उल्हासनगर नंबर 04 येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.