Harshvardhan Sapkal : सपकाळांच्या समर्थनात ओवैसी आणि इस्लाम पार्टी मैदानात!

Total Views |
Harshvardhan Sapkal
 
मुंबई : (Harshvardhan Sapkal) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  (Harshvardhan Sapkal) यांनी टिपू सुलतान याचा आदरार्थी उल्लेख करत "टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे", असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर त्यांच्या समर्थनासाठी आता लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इस्लाम पार्टी मैदानात उतरल्याचे दिसून आले. (Harshvardhan Sapkal)
 
ओवैसी यांनी सावरकरांवर टिका करत सांगितले की, टिपू सुलतानने भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बलिदान दिले. टिपू सुलतानच्या मृतदेहाजवळ राम लिहिलेली सोन्याची अंगठी सापडली होती. ही अंगठी २०१४ रोजी ब्रिटनमध्ये १४ हजार ४०० पाउंडला लिलावात विकली गेली. टिपूने तुरुंगातून सावरकरांसारखी माफीची पत्रे लिहिली नाहीत. (Harshvardhan Sapkal)
 
हेही वाचा : Harshvardhan Sapkal : 'टिपूप्रेम' सपकाळांच्या अंगलट 
 
मालेगावातील इस्लाम पार्टीचे संस्थापक असिफ शेख म्हणाले की, टिपू सुलतान आणि औरंगजेब हे विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांना विरोध का? हर्षवर्धन सपकाळ  (Harshvardhan Sapkal) यांनी अभ्यास करूनच स्टेटमेंट दिले असेल तर हरकत काय? असे म्हणत असिफ शेख यांनी सपकाळ यांची पाठराखण केली आहे. (Harshvardhan Sapkal)
 
सपकाळ पुन्हा बरळले
 
वर्धा येथे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले की, सावरकरांनी देखील शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. भगतसिंग कोश्यारी हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले, त्यांचे पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न मला उपस्थित करायचा आहे. (Harshvardhan Sapkal)
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.