मुंबई: (Mulund Metro Slab Collapse) १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील मुलुंड (पश्चिम) भागात मोठी दुर्घटना घडली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या मुंबई मेट्रो लाइन ४च्या कामादरम्यान उंचावरील पॅरापेटचा काँक्रीट भाग अचानक कोसळला. हा अवजड भाग खालून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर आणि रिक्षावर पडला. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. (Mulund Metro Slab Collapse)
घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी एमएमआरडीएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Mulund Metro Slab Collapse)
एमएमआरडीएने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. प्राथमिक चौकशीनंतर महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले. (Mulund Metro Slab Collapse)
हेही वाचा: Devendra Fadnavis: भायखळ्यात साकारणार जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना
दरम्यान मुलुंड पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करून कंत्राटदार व सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. (Mulund Metro Slab Collapse)
एकनाथ शिंदे यांचे सक्त आदेश...
उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेची गंभीर दखल घेत जबाबदारांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. सत्यजित साळवे या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला निलंबित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले.
दुर्घटनाग्रस्त मार्गासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या Louis Berger कंपनीला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्रत्यक्ष बांधकाम करणाऱ्या Milind Infra कंपनीवर ५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. एमएमआरडीएकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा खर्चही प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे.