Maha Shivratri 2026 : मुंबईच्या महाशिवरात्री उत्सवात काय घडलं?
15-Feb-2026
Total Views |
मुंबई (Maha Shivratri 2026): महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देशभरात शिवभक्तांचा जल्लोष या वर्षी अनुभवायला मिळला. अशातच मरोळ नाका इथल्या महाशिवरात्रीच्या देखाव्याने सर्वच भक्तगणांचे मन जिंकल्याचे पाहायाला मिळाले. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्रियुगी नारायण ट्रस्टच्या माध्यमातून मुंबईतील सर्वात मोठ्या ‘शिव बारात’चे आयोजन करण्यात आले होते.
दि. १५ फेब्रुवारीच्या सायंकाळी मरोळ येथील स्वयंभू पालेश्वर मंदिरापासून ते लोकभारती मार्ग, मरोळ भवन ते सागबाग येथील ओमकारेश्वर मंदिरापर्यंत आगळीवेगळी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भगवान ज्योतिबाची पालखी तथा भगवान शंकराच्या प्रतिकृतीचा समावेश होता. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मरोळ नाका येथील श्रीओंकारेश्वर मंदिरात सायंकाळी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनोख्या शिव तांडव नृत्याचा आस्वाद रसिकांनी घेतला. सागबाग येथील श्रीओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात हा कार्यक्रम उत्साहात भक्तांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.