Kisan Kathore: मुरबाड मधील शिवमंदिरात आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पूजा अर्चा

    15-Feb-2026   
Total Views |

कल्याण: (Kisan Kathore)
मुरबाड मधील निसर्गरम्य तलावा जवळील शंकरमंदिरा मध्ये आमदार किसन शंकर कथोरे आणि कमल किसन कथोरे यांच्या उपस्थितीत महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. (Kisan Kathore)

मुरबाड मधील निसर्गरम्य तलावाजवळ असलेल्या या शंकर मंदिरामध्ये शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. सदर कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे व त्यांच्या पत्नी कमल किसन कथोरे उपस्थित होत्या . तसेच भाजपचे जेष्ठ नेते उल्हासभाऊ बांगर, सुधीर भाई तेलवणे, कराळे सर , माजी नगराध्यक्ष मुकेश विशे, मोहन सासे, माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी, अर्चना विशे, नगरसेविका मार्केताई , नाना साबळे, संतोष जाधव उपस्थित होते. (Kisan Kathore)

शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. प्रसादाची व्यवस्था उगळे आळी मित्र मंडळ व दुधाळेपाडा ग्रामस्थ आणि दानशूर भाविकांनी केली. तसेच मूर्तिचे रंगकाम सचिन कुंभार यांनी केले. (Kisan Kathore)

शिवशंकराची मूर्ती भेट

भाजपचे जेष्ठ नेते सुधीरभाई तेलवणे यांना आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते 10किलो वजनाची शिवशंकराची पितळेची मूर्ती मंदिरात भेट देण्यात आली. (Kisan Kathore)