Ravindra Chavan : डोंबिवलीत नागरी अभिवादन न्यासाचा दिमाखदार अभिवादन सोहळा संपन्न

अभिवादन सोहळयातील सत्कारार्थींचा आदर्श घेण्यासाठी तरुणाई आणि विद्यार्थ्यांची कार्यक्रमास उपस्थिती आवश्यक - प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण

    15-Feb-2026   
Total Views |
Ravindra Chavan

डोंबिवली : (Ravindra Chavan) अभिवादन सोहळयातील सत्कारार्थींचा आदर्श घेण्यासाठी तरुणाई आणि विद्यार्थ्यांची कार्यक्रमास उपस्थिती आवश्यक आहे असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी व्यक्त केले.
 
डोंबिवली शहरातील पंचेचाळीसहून अधिक संस्थांनी एकत्र येऊन २०१४ साली स्थापन केलेल्या नागरी अभिवादन न्यासाचा अकरावा वार्षिक सन्मान सोहळा वक्रतुंड सभागृहात पार पडला. डोंबिवली शहराच्या गेल्या सात दशकांच्या वाटचालीत सक्रीय सहभागी होत आपला सेवा-वाटा उचलणारे ज्येष्ठ गायक वसंतराव आजगावकर, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे माजी खासदार आणि मंत्री जगन्नाथ पाटील आणि तरुण पिढीला ज्यांचा आदर्श ठेवता येईल असे खेळाडू आणि प्रशिक्षक पवन भोईर आणि भरत नाट्यम नर्तक आणि प्रशिक्षक पवित्र भट यांचा आयुक्तांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला. संस्थासन्मानांमध्ये कला साहित्य क्षेत्रात अग्रणी डोंबिवलीकर एक परिवार तर्फे संपादक आणि आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि प्रभू कापसे यांनी तर विविध उपक्रमांद्वारे वाचनाची गोडी टिकवून ठेवणाऱ्या पै फ्रेंड्स लायब्ररीसाठी संस्थापक पुंडलिक पै यांनी सत्कार स्वीकारला. आमदार रविंद्र चव्हाण यांनी असे अभिवादन कार्यक्रम पूर्वीप्रमाणे खुल्या मैदानात झाले पाहिजेत असे सांगितले.
 
हेही वाचा : स्थैर्य आणि संतुलनाची दुहेरी परीक्षा
 
अभिनव गोयल म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात प्रतिदिनी ५०० टन कचरा निर्माण होतो तो कमी कसा करता येईल यासाठी नागरिकांबरोबर बसून मार्ग काढू असे आश्वासन दिले.‌ कचरा समस्या खूप मोठी आहे. त्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे आणि कचरा कमी करण्यासाठी सहकार्य मिळविणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर जोगळेकर यांनी केले आणि प्रवीण दुधे यांनी ऋणनिर्देश केला. रिद्धी करकरे हिने सूत्रसंचालन केले तर सुरभी देवस्थळी हिने संपूर्ण वंदेमातरम सादर केले.
 
नागरी अभिवादन न्यासाचे उपाध्यक्ष माधव जोशी, कोषाध्यक्ष जयंत फलके, आणि विश्वस्त सर्वश्री विनोद करंदीकर, संदीप वैद्य , सचिन बोडस आणि दर्शना सामंत आणि ३५० नागरिक सोहळ्यास उपस्थित होते. गुरुकुल द डे स्कूल संस्थापक अजित करकरे हे समारंभ अध्यक्ष होते.