Piyush Goyal : जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी तडजोड नाही

14 Feb 2026 18:01:58
Piyush Goyal
 
मुंबई : (Piyush Goyal) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देश आज प्रचंड आत्मविश्वासानिशी वाटचाल करत असून यामध्ये भारत आपल्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस श्वेता परुळकर, राजेश शिरवाडकर, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.(Piyush Goyal)
 
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले की, "पंतप्रधानांच्या पुढाकाराने जगातील ३८ राष्ट्रांसोबत भारताच्या मुक्त व्यापार करारांची वाटचाल सुरू झाली असून जगातील व्यापारक्षेत्राचा ७० टक्के भाग भारतासाठी खुला झाला आहे. भारतासाठी सर्वतोपरी लाभदायक ठरणाऱ्या या करारातून देशाचे संपूर्ण हित जपले जाईल आणि शेतकरी वा अन्य कोणत्याही क्षेत्राच्या हितास बाधा येणार नाही. जागतिक व्यापारक्षेत्रातील संधींचे दरवाजे भारतासाठी खुले होत असल्याने, अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतास या करारांचा अधिक लाभ होणार असून भारतातील शेतकरी, दूध, जीएम फूड यांना या करारातून वगळून शेतकऱ्यांचे हित जपले जात आहे. अन्य क्षेत्रांतील उत्पादनांस जगाच्या पाठीवरील नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची अभूतपूर्व संधी या करारांमधून मिळणार असून यामुळे निर्यात, रोजगार आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अमृतकाळात विकसित भारताची वाटचाल अधिक बलशाली करणारे महत्वाचे पाऊल या अर्थसंकल्पाद्वारे केंद्र सरकारने टाकले आहे," असेही ते (Piyush Goyal) म्हणाले.
 
हेही वाचा : Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्ग विकासाचा नवा सुपरकनेक्ट! 
 
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा
 
आर्थिक प्रगती, आत्मनिर्भरता, मूलभूत सुविधांना वेग, यांमुळे अर्थव्यवस्थेस साडेतीन पट अधिक बळ प्राप्त झाले आहे. १४० कोटी देशवासीयांच्या आशाअपेक्षा पूर्ण करणे, देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच उत्पादनक्षेत्रास गती देणे, रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रास प्रोत्साहन व रोजागाराच्या नव्या संधी देणे, पतहमी योजनेस प्रोत्साहन, विदेशी गुंतवणूकीतून रोजगार वाढविणे, विदेशी चलननिर्मिती, नवीनीकृत ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन अशा बहुपेडी उद्देशातूंन देशाच्या प्रगतीची नवी वाटचाल पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. त्याचा थेट लाभ महाराष्ट्राला आणि मुंबईला मिळणार आहे. तीन नवे केमिकल पार्क, टेक्स्टाईल पार्क, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे प्रकल्प, 'सबका साथ सबका विकास ' या ध्येयानुसार देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास या कर्तव्यभावनेतून अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे. महाराष्ट्रात या नीतीचा मोठा फायदा होणार आहे," असेही त्यांनी सांगितले.(Piyush Goyal)
 
ते (Piyush Goyal) पुढे म्हणाले की, "रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात येत असून महाराष्ट्राकरिता २४ हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस प्रोत्साहन देणाऱ्या योजना, पुणे, नागपूरमध्ये ग्रोथ हबच्या रूपाने येत्या पाच वर्षांत विकास साधला जाणार असून त्यासाठी प्रत्येक शहराकरिता पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-पुणे व पुणे हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची योजना आखली जात आहे. अर्थसंकल्पाच्या प्रत्येक पैलूमध्ये महाराष्ट्राचा लाभ आणि महाराष्ट्राचे योगदान प्रतिबिंबित होत आहे."
 
काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नाही
 
"काँग्रेसमध्ये नैराश्य दाटले आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याखेरीज त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही, कोणतेही प्रस्ताव नाहीत आणि अपप्रचार करून केंद्र सरकारवर टीका करण्याखेरीज कोणताही मुद्दादेखील काँग्रेसकडे नाही. त्यामुळेच एकामागून एक खोटे पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. मात्र, राहुल गांधी यांच्यासारखा नेता आणि त्यांच्या आघाडीस ज्याप्रकारे जनतेने नाकारले आहे, ते पाहता त्यांचे हे नैराश्यग्रस्त प्रयत्न यशस्वी होणार नाहीत," असेही पीयुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0