Hind-Di-Chadar : ठाणे महानगरपालिका हद्दीत ‘हिंद-दी-चादर’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

    14-Feb-2026
Total Views |
 Hind-Di-Chadar
 
ठाणे : (Hind-Di-Chadar) ‘हिंद-दी-चादर’ (Hind-Di-Chadar) म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.(Hind-Di-Chadar)
 
नौपाडा येथील सौ. आनंदीबाई केशव जोशी शाळेच्या विद्यार्थंना प्रभात फेरी काढून गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या कार्याचा जागर केला. ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 130 मधील विद्यार्थंनी येथे प्रभात फेरी काढून घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखविण्यात आले. (Hind-Di-Chadar)
 
हेही वाचा : Sharmila Pimpolkar : महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत
 
या उपक्रमांचा मुख्य उद्देश तरुण पिढीने गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग, बलिदान आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले योगदान स्मरणात ठेवावे, तसेच राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक मूल्यांची जपणूक करावी, हा आहे.(Hind-Di-Chadar)