Charni Road-Girgaon Bridge : चर्नी रोड-गिरगाव पुलाला सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाचा विरोध

मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत स्थानिकांचे आंदोलन

    14-Feb-2026   
Total Views |
Charni Road-Girgaon Bridge

मुंबई : (Charni Road-Girgaon Bridge) चर्नी रोड-गिरगाव पुलाला (Charni Road-Girgaon Bridge) विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात गिरगाव पूल बचाव समिती आणि मंगळवाडी-केळेवाडी रहिवासी संघटना यांच्या वतीने सेल्फी हॉस्पिटलच्या गेट समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा हेसुद्धा या आंदोलनात सहभागी झाले असून सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही, पुल होणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.(Charni Road-Girgaon Bridge)
 
सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाने गेली चार वर्ष पुलाचे काम रखडवले आहे. चर्नी रोड आणि गिरगावला जोडणाऱ्या पुलाअभावी गिरगावकर हाल सहन करत आहेत. याठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात दोन जणांचा हकनाक बळी गेल्याची माहितीही यावेळी गिरगाव पुल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दीड वर्षापूर्वी न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाचे काम सुरू झाले. मात्र, पुन्हा सैफी हॉस्पिटलने मनमानी करून बांधकाम थांबवले. आता मुंबई महापालिकेचा कारभार नव्याने सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष पुन्हा या मुद्यावर केंद्रित होण्यासाठी गिरगावकर रस्त्यावर उतरले असल्याचे या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.(Charni Road-Girgaon Bridge)
 
हेही वाचा : काँग्रेसच्या लांगुलचालनाचा कळस; टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांशी तुलना, काँग्रेसने माफी मागावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
 
गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे
 
गेली तीन वर्षे गिरगाव मधील चर्नी रोड ते केळेवाडी पर्यंत पुल व्हावा, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सातत्याने लढा दिला आहे. प्रशासकीय पातळीवर मुंबई महापालिका तसेच पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल प्रशासनाशीही त्यांनी बैठका घेतल्या. मुंबई महापालिकेकडे या पुलाचा पाठपुरावा करून त्यांनी पालिकेकडून मान्यता मिळवली. त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली. मात्र, सैफी हॉस्पिटलने या पुलाच्या (Charni Road-Girgaon Bridge) विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुंबई महपालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. पालिकेने पुलाचे कामही सुरू केले. पुलाचे ६० टक्के काम पूर्ण होत असतानाच, पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने यात अडवणूक केली आहे. या विरोधात गिरगावकरांनी केलेल्या आंदोलनात मंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेऊन गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.(Charni Road-Girgaon Bridge)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....