मानखुर्दमधील रेणुकादेवीचे मंदिर धार्मिकतेसोबतच सामाजिक उत्थानाचेही प्रेरणा केंद्र : मंगल प्रभात लोढा
14-Feb-2026
Total Views |
मुंबई : “माता रेणुकादेवीचे मंदिर हे धार्मिकतेसोबतच सामाजिक उत्थानाचेही प्रेरणा केंद्र आहे,” असे प्रतिपादन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. कारण सुशिक्षित आणि एका स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्राची कांबळे या गेली अनेक वर्षे रेणुकामातेची पूजा करत आहेत. एक दशकापूव या मंदिराची स्थापना त्यांनीच केली होती. मंदिरामार्फत परिसरातील गोरगरीब गरजू व्यक्ती आणि किन्नरांंच्या कल्याणासाठी कार्य केले जाते.
मानखुर्द लल्लूभाई कंपाउंड येथे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सहकार्याने नुकतेच श्री रेणुकादेवी मंदिराचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. शुक्रवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी मंदिरामध्ये गणेशपूजा, पुण्य वचन, मातृपूजा आणि नवग्रहपूजा, वास्तुशांती करण्यात आली. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंदिराच्या पुजारी किन्नर भगिनी प्राची कांबळे, किन्नर गुरू सध्या माने, सामाजिक कार्यकर्ते अंबुराज मणी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय नगरकर, बबलू सिंग, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती साठे उपस्थित होत्या.
मंदिराच्या माध्यमातून मदत करणार
माता रेणुकादेवी भक्तांच्या हाकेला धावते. पूव हे छोटे मंदिर होते. आता या मंदिराला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी पूर्ण सहकार्य केले. धर्मश्रद्धेसाठी ते नेहमी पुढे असतात, याचा प्रत्यय आला. किन्नर आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी या मंदिराच्या माध्यमातून सदैव कार्यरत असणार आहे. - प्राची कांबळे, पुजारी, रेणुकादेवी मंदिर