Kalwa Police Station : कळवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

चोरीला गेलेले ८३ मोबाईल नागरिकांना केले परत

    14-Feb-2026
Total Views |
Kalwa Police Station
 
ठाणे : (Kalwa Police Station) कळवा पोलीस ठाणे (Kalwa Police Station) परिसरात २०२५-२६ या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरविलेले असून त्याबाबत ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील कळवा पोलीस स्टेशन येथे प्रॉपर्टी मिसिंग नोंदी करण्यात आलेल्या आहेत. यामुळे आता पर्यंत ४२५ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.(Kalwa Police Station)
 
कळवा पोलीस स्टेशनच्या (Kalwa Police Station) हद्दीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक विठ्ठल नावडे, पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनीं गुन्हे प्रकटीकरण कर्मचाऱ्यासमवेत प्रॉपर्टी मिसिंगची प्रकरणे उघडकीस आणण्या बाबत सूचना केल्या होत्या, याला यश येत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एकूण एकूण १२ लाख ४७ हजार किमतीचे ८३ मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी पार्ट दिले. सीइआयआर या पोर्टलच्या मदतीने व विविध तांत्रिक पद्धतीने कळवा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.(Kalwa Police Station)