Mumbai Metro Pillar Collapse : मुलुंड येथे निर्माणाधीन मेट्रो पिलरचा हिस्सा कोसळला; मुख्यमंत्री म्हणाले...

दुर्घटनेत दोन जण जखमी ; जखमींवर उपचार सुरु

Total Views |
Mumbai Metro Pillar Collapse
 
मुंबई : (Mumbai Metro Pillar Collapse) मुलुंड पश्चिम येथे बांधकामाधीन मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली)च्या कामादरम्यान खांबाचा एक काँक्रीट भाग कोसळून थेट एका ऑटो-रिक्शावर आणि पुलाखालून जाणाऱ्या कारवर पडल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि.१४ रोजी दुपारी १२.१५च्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. जखमींवर तात्काळ उपचार सुरु केले असून एमएमआरडीएकडून संबंधित घटनेची कसून चौकशी केली जाणार असल्याचेही कळते आहे.(Mumbai Metro Pillar Collapse)
 
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे १२.२० वाजता एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. निर्माणाधीन कामादरम्यान मेट्रो खांबाच्या पुलावरील काँक्रीट सिमेंटचा एक भाग अचानक तुटून खाली पडला आणि त्या वेळी रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो-रिक्शावर आणि कारच्या समोरील भागावर कोसळला.(Mumbai Metro Pillar Collapse)
 
या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस पथक, मेट्रो प्रशासनाचे कर्मचारी, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेनंतर एलबीएस रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, खांबाचा भाग नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्यात येणार असून संबंधित जबाबदाऱ्यांची निश्चिती केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Mumbai Metro Pillar Collapse)
 
हेही वाचा : Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेत एकाच मृत्यू ; तीन जण गंभीर जखमी
 
एमएमआरडीएच्या माध्यामातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो मार्ग ४(ग्रीन लाईन)च्या बांधकामादरम्यान झालेल्या अपघाताची दखल घेऊन त्याची चौकशी केली जाणार आहे. मात्र आता अपघाताच्या ठिकाणी मेट्रोचे अधिकरी, कर्मचारी आणि यंत्रणा पोहोचून जखमींना मदत करत आहेत. त्याचवेळी वेगळ्या टीमच्या माध्यमातून चौकशी करून दोषींवर लगेचच कारवाई केली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.(Mumbai Metro Pillar Collapse)
 
आज दुपारी सुमारे १२:१५ वाजता मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील मेट्रो लाईनच्या बांधकाम स्थळावरील पिअर P196 परिसरात एक अपघाताची घटना घडली. उंचावरून पॅरापेट सेगमेंटचा एक भाग खाली पडून जात असलेल्या ऑटो रिक्षावर आदळला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. मेट्रो प्रकल्पाची टीम घटनास्थळी उपस्थित असून, मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या समन्वयाने मदतकार्य व परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे.(Mumbai Metro Pillar Collapse)
 - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
 
मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.(Mumbai Metro Pillar Collapse)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.