Sharmila Pimpolkar : महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत

राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    14-Feb-2026
Total Views |
Sharmila Pimpolkar
 
ठाणे : (Sharmila Pimpolkar) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका मार्फत राबविण्यात येत असलेली सर्वंकष स्वच्छता मोहीम शनिवारी प्रभाग क्र. 1 मध्ये महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या आनंदनगर अग्निशमन केंद्र परिसरात स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.(Sharmila Pimpolkar)
 
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, नगरसेविका अनिता ठाकूर, नगरसेवक विक्रांत तांडेल, सहायक आयुक्त सोनल काळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग नोंदविला.(Sharmila Pimpolkar)
 
महापौरपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी कोपरी परिसरातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. स्वच्छता ही नियमितपणे केली जात असली तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची सखोल साफसफाई, पाण्याने रस्ते धुणे अशा व्यापक स्वरूपातील मोहिम सर्व 33 प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.(Sharmila Pimpolkar)
 
हेही वाचा : Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेत एकाचा मृत्यू ; तीन जण गंभीर जखमी 
 
आनंदनगर अग्निशमन केंद्र येथून मोहिमेला प्रारंभ करून आनंदनगर सिग्नल, कावेसर, कासारवडवली आणि ओवळा या भागांत सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. या अभियानासाठी एक जेटिंग गाडी, दोन सीएनडी गाड्या, कचरा उचलण्यासाठी दोन आरसी कॉम्पॅक्टर व चार घंटागाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. सुमारे 200 सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने रस्ते झाडून कचरा उचलण्यात आला तसेच एसटीपीच्या पाण्याने रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात आले.(Sharmila Pimpolkar)
 
या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अक्षय सदगीर, रवींद्र म्हात्रे, महेश गायकवाड, गणेश रिपोर्टे, सुमित जाधव, समीर डोळे, उमेश सावंत, कांतीराम गायकर, प्रशांत खांबे, विशाल खांबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सक्रियपणे सहभागी झाले होते.(Sharmila Pimpolkar)
 
स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.(Sharmila Pimpolkar)