मुंबई : (Sanjay Gandhi National Park) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली) (Sanjay Gandhi National Park) परिसरातील अतिक्रमणधारकांनी पुनर्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे १७ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ७.३० ते सायंकाळी ९.३० या वेळेत संबंधित केंद्रांवर सादर करावीत, असे आवाहन उद्यान प्रशासनाने केले आहे.(Sanjay Gandhi National Park)
उच्च न्यायालय, मुंबई यांच्या जनहित याचिका क्र. ३०५/१९९५ मधील आदेशानुसार उद्यानातील अतिक्रमणे हटवून पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत ही प्रक्रिया सुरू असून संबंधित अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.(Sanjay Gandhi National Park)
उपसंचालक (दक्षिण) यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रातील अतिक्रमणधारकांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये १६ हजार ४७८ जणांचा समावेश आहे. ही यादी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्राथमिक यादीत नाव असलेल्या तसेच पात्रता निकषांनुसार पुनर्वसनासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. (Sanjay Gandhi National Park)
आवश्यक कागदपत्रे
दि. ०१.०१.१९९५ च्या मतदार यादीतील नावाचा पुरावा (छायांकित प्रत)
पुनर्वसन प्रक्रियेत पूर्वी रु. ७,००० जमा केल्याची पावती (छायांकित प्रत)
वन विभागाने दिलेले ओळखपत्र / अधिवास प्रमाणपत्र
दि. ०१.०१.१९९५ ते ०१.०१.२०११ दरम्यान मतदार यादीतील नावाचा पुरावा
अतिक्रमणाचा ओळखपुरावा / मतदान ओळखपत्र
आधार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी अन्य ओळखपत्रे
प्राथमिक यादीत नाव नसलेल्या, परंतु प्रत्यक्ष वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाही पात्रता तपासणीसाठी अंतिम संधी देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : मानखुर्दमधील रेणुकादेवीचे मंदिर धार्मिकतेसोबतच सामाजिक उत्थानाचेही प्रेरणा केंद्र : मंगल प्रभात लोढा
कागदपत्रे सादर करण्याची केंद्रे
१) चिंचपाडा, नवापाडा, राणापाडा, केल्हाईपाडा, तुमणीपाडा, मलेपाडा, तलेपाडा, राजनीपाडा, चुनापाडा, डँमपाडा, धारखाडी, केतकी पाडा, केशव नगर , पांडे कम्पाऊंड व इतर अतिक्रमित क्षेत्र आदी परिसर.
ठिकाण: पुनर्वसन कक्ष, जुने वनपरिक्षेत्र कार्यालय, मुख्य प्रवेशद्वार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली.
२) दामू नगर, भीमनगर, सातारा कॅम्प, गांधी नगर , पाटाचे पानी, आकारची भट्टी, देवी पाडा, चुनापाडा, लहुगड, गौतमनगर रामगड आदी परिसर
ठिकाण: पुनर्वसन कक्ष, गौतम नगर संरक्षण कुटी, दामूनगर नाल्याच्या बाजूला, लहुगड रोड
३) क्रांती नगर, सावित्रीबाई फुले नगर, आदिवासी नगर, महेश्वरी नगर, कटींग नं. १०, आंबेडकर नगर आदी परिसर
ठिकाण: पुनर्वसन कक्ष, अप्पापाडा संरक्षण कुटी, आनंदनगर बस थांबा.
४) जाम ऋषी नगर, पिंपरी पाडा, मावळे नगर मोची पाडा, बंजारी पाडा, संजय नगर, आंबा पाडा, वायशेत पाडा, मातंग गड, कलमाचा पाडा, निंबोणी पाडा, बारीक पायरी, भाटुकली पाडा, १ व २, डुक्कर भुजी पाडा आदी परिसर
ठिकाण: पुनर्वसन कक्ष, वन परिमंडळ कार्यालय, मालाड स्थित, संजय नगर (पठाणवाडी)
५) खिंडीपाडा, हनुमान पाडा, पंचशील नगर, राहुल नगर, शंकर टेकडी, पळस पाडा, घाटी पाडा, गणेश नगर, उलटण पाडा, साई बांगोडा आदी परिसर
ठिकाण: पुर्नवसन कक्ष, वन परिमंडळ अधिकारी कार्यालय, खिंडीपाडा दर्गा रोड, मुलुंड पश्चिम
निर्धारित कालावधीत कागदपत्रे सादर करणाऱ्या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबत पात्रता किंवा अपात्रता निश्चित करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपसंचालक (दक्षिण) किरण पाटील यांनी दिली आहे.(Sanjay Gandhi National Park)