मुंबई : (Bangladesh Election Results) बांगलादेशमध्ये हिंसा आणि तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कट्टरपंथी प्रवृत्तीसाठी ओळखले जाणारे तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने ऐतिहासिक विजयाचा दावा केला असून ३०० पैकी २०९ जागा जिंकत दोन-तृतीयांश बहुमत त्यांनी मिळवल्याचे समोर येत आहे. मात्र मतदान सुरु असताना खुलना–२ मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांच्या समर्थकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याचे निदर्शनास आले. या हिंसाचारात खुलना महानगर बीएनपीचे माजी नेते ठार झाल्याची माहिती आहे.(Bangladesh Election Results)
बांगलादेशातील ही निवडणूक २०२४ मधील विद्यार्थी आंदोलन आणि शेख हसीना यांच्या सत्ताबदलानंतरची पहिली मोठी राजकीय परीक्षा होती. अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद यूनुस यांच्या देखरेखीखाली या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला यात सहभागी होऊ देण्यात आले नाही. निवडणुकीदरम्यान देशाच्या अनेक भागांतून हिंसा आणि स्फोटांच्या घटना समोर आल्या, ज्यामुळे कट्टरपंथी शक्ती बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Bangladesh Election Results)
मिळालेल्या माहितीनुसार, आलिया मदरसा केंद्रावर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांच्या समर्थकांमध्ये तणाव वाढला. महानगर बीएनपीचे माजी उप-कार्यालय सचिव शमसुज्जमां चंचल यांनी आरोप केला की मतदान सुरू होताच मतदान केंद्राच्या आत जमातच्या बाजूने प्रचार केला जात होता. कोच्ची यांनी याला विरोध केल्याने गोंधळ उडाला आणि झटापटीदरम्यान ते खाली पडले. चंचल यांच्या दाव्यानुसार, पडल्यावर कोच्चींना हृदयविकाराचा झटका आला.(Bangladesh Election Results)
हेही वाचा : Supreme Court Reprimands Dargah Management : महाशिवरात्रीच्या पूजेवरून वाद; सर्वोच्च न्यायालयाने दरगाह व्यवस्थापनाला फटकारले!
मतदानादरम्यान मुंशीगंज सदर उपजिल्ह्यातील मखाती गुरुचरण हायस्कूल येथे देशी बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती आहे. सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहम्मद मोमिनुल इस्लाम यांनी या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की सकाळी सुमारे १० वाजता दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून झटापट झाली आणि त्याच वेळी बॉम्बचा स्फोट करण्यात आला.या स्फोटात अन्सार दलातील दोन सदस्यांसह तीन जण जखमी झाले. स्फोटामुळे मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराचे अंशतः नुकसान झाले होते.(Bangladesh Election Results)
भारतविरोधी हालचाली आणि अल्पसंख्याकांवरील धोका
तारिक रहमान यांचा भूतकाळ भारतविरोधी भूमिकेसाठी आणि हिंदू अल्पसंख्याकांविषयी कठोरतेसाठी ओळखला जातो. बीएनपीचा ‘फ्रेंड यस, मास्टर नो’ हा नारा भारतासोबतच्या पारंपरिक संबंधांमध्ये बदल घडवण्याचा संकेत देतो. पूर्वी बीएनपीवर सीमावर्ती भागात दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे आरोप झाले होते. नवी दिल्लीसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे सीमा सुरक्षा आणि बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेची खात्री करणे.(Bangladesh Election Results)
चीन–पाकिस्तानचा वाढता प्रभाव
तारिक रहमान सत्तेत आल्यानंतर बांगलादेश पाकिस्तान आणि चीनच्या रणनीतिक प्रभावाखाली जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, नवी सरकार शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकते. दोन्ही देशांतील व्यापारिक संबंध महत्त्वाचे असले तरी कूटनीतिक पातळीवर भारतासाठी पुढील काळ अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.(Bangladesh Election Results)