मुंबई : (Ubatha Parbhani Dispute) उबाठा गटाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अक्षरश: डोक्यावर घेतली होती. मराठी-अमराठी असं चित्र तयार करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. मात्र, एवढं करूनही मुंबईत त्यांना सत्तेने हुलकावणी दिली. पण सत्तेसाठी कायपण ही ठाकरेंची आजवरची मानसिकता. परभणी महानगरपालिकेतून त्यांच्या या मानसिकतेचं प्रकर्षाने दर्शन घडलं. हिंदुत्वाला तिलांजली देत उबाठा गटाने परभणीत मुस्लीम महापौर बसवला आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपली हिंदूविरोधी भूमिका अधोरेखित केली. तर, परभणी महापालिकेतील सत्ता समीकरण नेमकं काय आहे? उबाठा गटाला हिंदुत्वाचा विसर पडलाय का? आणि मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा केवळ भाषणांपुरताच शिल्लक राहिलाय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.(Ubatha Parbhani Dispute)
महापालिका निवडणूकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी फक्त मराठीच्या मुद्यावर राजकारण केलं. मराठीसाठी पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, एकत्र निवडणूक लढवली. एवढंच नाही तर, मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरूनही मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केला. मराठी माणूस, मराठी अस्मिता, हिंदुत्व अशा अनेक गर्जना त्यांनी आपल्या सभांमधून केल्या. पण यावेळी जनतेने ठाकरे ब्रँडला नाकारलं.(Ubatha Parbhani Dispute)
निवडणूकांच्या निकालानंतर राज्यातील २९ महानगपालिकांपैकी उबाठा गटाला एकमेव परभणी महापालिकेत सत्ता स्थापनेची संधी मिळाली. मात्र, यावेळी उद्धव ठाकरेंना आपल्या हिंदुत्वाचा विसर पडला. इथे केवळ खुर्चीसाठी त्यांनी मुस्लीम कार्ड खेळलं. परभणीत उबाठा गटाचे सय्यद इक्बाल हे महापौर तर, काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर बनले.(Ubatha Parbhani Dispute)
परभणीसारख्या अस्सल ग्रामीण महाराष्ट्राच्या एका शहरात उबाठा गटाचा मुस्लीम महापौर विराजमान झाला. बरं, उबाठाचे हिंदू नगरसेवक निवडूनच आले नाही का, तर तसंही नाही. उबाठाचे एकूण २५ नगरसेवक परभणीत विजयी झाले. यापैकी १२ नगरसेवक हिंदू तर, १३ मुस्लीम नगरसेवक आहेत. त्यामुळे कदाचित उबाठा गटाने या अधिकच्या एका नगरसेवकामुळे मुस्लीम नगरसेवकालाच महापौरपद देणं पसंत केल्याचं दिसतंय. या महापौर निवडणुकीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरली.(Ubatha Parbhani Dispute)
वास्तविक, चंद्रपूर महापालिकेत उबाठा गटाने काँग्रेसला धक्का देत भाजपला पाठींबा दिला. त्यामुळे आता परभणीत काँग्रेस उबाठा गटाला साथ देणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, काँग्रेसच्या जोरावर महापौरपदी उबाठा गटाचे सय्यद इक्बाल तर, उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख विराजमान झालेत. खरंतर, महापौर किंवा उपमहापौर कोणत्या जाती, धर्माचा आहे यापेक्षा सत्तेसाठी एखादा नेता आपली भूमिका आणि विचारधारेशी कशी तडजोड करतो, हे पाहणं अधिक महत्वाचं ठरतं. उबाठा गटाच्या बाबतीतही तेच घडलं. ज्यांच्या वडीलांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लागते त्यांनीच मतांसाठी लांगुलचालनाचे प्रयोग करावे, ही गोष्ट गंभीर म्हणावी लागेल.(Ubatha Parbhani Dispute)
मुंबई महापालिका निवडणूकीदरम्यान, भाजप नेते अमीत साटम यांनी उद्धव ठाकरेंचा महापौर निवडून आला तर तो खान असेल, अशी टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यावर सारवासारव केली असली तरी, ही टीका आता त्यांनी खरी करून दाखवली. त्यामुळे ‘खान महापौर होईल’ हे म्हणणं परभणीत वास्तवात उतरलं.(Ubatha Parbhani Dispute)
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची साथ सोडून काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यानंतर प्रत्येक निवडणूकीत मतपेटीसाठी केलेलं मुस्लीमांचं लांगुलचालन आणि आता थेट मुस्लीम महापौर देण्याची त्यांची भूमिका यातून निश्चितच त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विसर पडल्याचं स्पष्ट झालंय. बरं, हे असंच आहे तर मग प्रत्येक सभेत हिंदूत्वाच्या घोषणा कशासाठी? ही दुटप्पी भूमिका कशासाठी? हे प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्यावाचून राहत नाही. यावरून उबाठा गटात सत्तेसाठी विचारसणीला दुय्यम स्थान मिळतं, हे स्पष्ट झालं आहे.(Ubatha Parbhani Dispute)
उबाठा गटाने घेतलेला निर्णय हा तात्कालिक राजकीय गरज म्हणून पाहायचा की, त्यांच्या विचारसरणीतील बदल म्हणून, हे मतदार आणि राजकीय निरीक्षकच ठरवतीलच.(Ubatha Parbhani Dispute)