Sanjay Shirsat : मराठी माणसासाठी लढणाऱ्यांची भूमिका आता बदलली- संजय शिरसाट
बाळासाहेब असते तर यांना लाथ मारली असती
13-Feb-2026
Total Views |
मुंबई : (Sanjay Shirsat) "मुंबईत मराठी माणसा व्यतिरिक्त कोणी महापौर होऊ नये मुस्लिम तर दूरच हिंदी भाषिक पण नसावा अशी जी भावना उबाठा ची होती मग मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढतोय असे म्हणणारे आता गेले कुठ,यांना गुजराती, पंजाबी,सिंधी चालत नाही पण मुस्लिम माणूस चालतो याचा अर्थ आता त्यांची भूमिका बदलली आहे.ते बोलतात एक आणि करतात एक हे राज्याने पाहिलेले आहे. हिंदू मतांचं विभाजन झाल्यामुळे आता इतर मत आपल्याला मिळावेत यासाठी उध्दव ठाकरेंनी केलेला हा प्रयत्न आहे."अशी बोचरी टीका शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर शुक्रवार दि.१३ रोजी केली आहे.
"आमच्यावर खोक्यांचे जे आरोप व्हायचे तेच आरोप आता त्यांच्यावर उलटले आहेत.तसेच चंद्रपूर सारख्या तडजोडी आता संपूर्ण राज्यात पाहायला मिळतील. आम्ही महायुतीत आहोत आणि महायुतीच्या पद्धतीनेच आमचा कारभार चालू राहील. त्यामुळे सगळीकडे महायुतीचेच जिल्हा परिषद अध्यक्ष राहतील. आम्ही भाजपच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करतोय असे समजण्याचे कारण नाही."(Sanjay Shirsat)
"राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. उचलली जीभ लावली दाढीला हे राऊत यांनी करून दाखवावे. बोलताना वाक्याचा वापर कुठ करावा ही अक्कल नसलेली लोक आहेत. आणि आम्हाला शहाणपण शिकवायला चालले आहेत. वंदनीय बाळासाहेब असते तर यांना फिरवून मागून लाथ मारली असती." अशी टीका मंत्री शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली.
"२०१९ ला पहिल्यांदा शेण खाण्याच काम राऊत आणि उबाठा गटाने केले आहे. ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हयातभर काँग्रेसचा विरोध केला होता सत्तेसाठी त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणे याला शेण खाणे म्हणतात." अशी खरमरीत टीका भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.