Thane Coastal Road : ठाणे कोस्टल रोडच्या कामांना गती

13 Feb 2026 18:27:17
Thane Coastal Road
 
मुंबई : (Thane Coastal Road) बांधकाम सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत ठाणे कोस्टल रोड (Thane Coastal Road)  टप्पा १ प्रकल्पाने वेगवान प्रगती करत महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे. उन्नत व्हायाडक्टच्या पायाभूत कामांपैकी तब्बल ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, पिअर कॅप आणि आय-गर्डर उभारणीचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. या झपाट्याच्या प्रगतीमुळे ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे, असेही एमएमआरडीएने नमूद केले.(Thane Coastal Road)
 
सुमारे १३.४५ किलोमीटर लांबीचा, सहा-लेनचा प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड कॉरिडॉर अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारला जात आहे. विशेष म्हणजे, भारतात प्रथमच एखाद्या ग्रीनफिल्ड रस्ता प्रकल्पात मोनोपाइल फाउंडेशनसह सिंगल-पाइल, सिंगल-पिअर प्रणाली वापरली जात आहे. यामुळे बांधकाम अधिक मजबूत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे.(Thane Coastal Road)
 
हेही वाचा : Amit Thackeray on Musical Road : मुंबईकरांना खरंच ‘याची’ गरज आहे का?, ‘जय हो’ गाणं का वाजवल?, अमित ठाकरेंना पडला प्रश्न  
 
हा कॉरिडॉर धोरणात्मक मालवाहतूक मार्ग म्हणून विकसित केला जात असून, घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होईल. ठाणे खाडीकिनाऱ्यालगत हा मार्ग NH-160 (मुंबई–नाशिक महामार्ग) आणि गायमुख यांना जोडणार आहे. संवेदनशील मॅंग्रोव्ह परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी मार्गाचे मोठे भाग व्हायाडक्ट आणि पुलांवर उभारले जात आहेत.(Thane Coastal Road)
 
भविष्यात इतर रस्त्यांशी मजबूत जोडणी
 
गायमुख येथे हा प्रकल्प आगामी गायमुख-फाउंटन हॉटेल बोगद्याशी थेट जोडला जाणार असून, त्यामुळे ठाणे–भाईंदर दरम्यान अखंडित आणि वेगवान प्रवास शक्य होईल. परिणामी, वधावन बंदर, जेएनपीए, दक्षिण महाराष्ट्र तसेच कर्नाटककडे जाणारी मालवाहतूक अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे. याशिवाय, हा कॉरिडॉर ठाणे रिंग मेट्रो, ठाणे कोस्टल रोड टप्पा २, साकेत–अमणे एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि कासारवडवली–खारबाव रस्ता अशा भविष्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढील पिढीच्या वाहतूक जाळ्याचा हा कणा ठरेल, यात शंका नाही. ठाणे कोस्टल रोड टप्पा १ केवळ एक रस्ता नसून, तो शहराच्या वेगवान आणि शाश्वत विकासाचा नवा अध्याय ठरत आहे.(Thane Coastal Road)
 
Powered By Sangraha 9.0