हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; शिवसेनेने दिले निवेदन, सोमवारपर्यंत फोटो न काढल्यास दिला आंदोलनाचा इशारा
13-Feb-2026
Total Views |
नाशिक : (Malegaon Deputy Mayor Dispute) मालेगाव महानगरपालिकेतील समाजवादी पार्टीचे नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनामध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शान-ए-हिंद हे इस्लाम पक्ष, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटचे उपमहापौर आहेत. त्यांच्या या कृतीने मालेगावमधील हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.(Malegaon Deputy Mayor Dispute)
दरम्यान, सकल हिंदू समाजाकडून शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी शंख वाजवून आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि उपमहापौर यांच्यात जोरदार संघर्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारपर्यंत फोटो काढला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.(Malegaon Deputy Mayor Dispute)
मालेगाव महानगरपालिकेमध्ये स्थानिक पक्ष असलेल्या इस्लाम पक्षाची सत्ता असून नसरीनबानो शेख खालीद हाजी या महापौर आहेत. इस्लाम पक्षाने समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला सोबत घेत सेक्युलर फ्रंट स्थापन करत मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे.(Malegaon Deputy Mayor Dispute)
या सर्व प्रश्नावर मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी सांगितले की, "मी उपमहापौर झाल्यानंतर मला काही जणांनी हा फोटो भेट दिला आणि मी तो माझ्या दालनामध्ये लावला. यामध्ये वाईट काय झाले? टिपू सुलतान हे एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे त्यांच्या फोटोचा मी आदर केला आहे," असे त्यांनी सांगितले.(Malegaon Deputy Mayor Dispute)
दरम्यान, फोटो लावल्याची घटना समोर आल्यानंतर मालेगाव आणि परिसरातील सर्वच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आपल्या दालनातून टिपू सुलतानचा फोटो तातडीने काढावा, अशी मागणी केली. या मागणीकडे मागील दोन दिवसांपासून उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद दुर्लक्ष करत होत्या. त्यामुळे याबाबत शुक्रवारी मालेगाव महापालिकेमध्ये शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला.(Malegaon Deputy Mayor Dispute)
नगरसचिवांना दिले पत्र
विविध नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर यांच्या दालनामध्ये जाऊन संबंधित फोटो काढावा अशी मागणी केली. याबाबतचे पत्र मालेगाव महापालिकेच्या नगरसचिवांना देखील देण्यात आले आहे. यावर उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद फोटो काढण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत उपमहापौरांवर जातीय सलोखा बिघडवण्याचा आरोप देखील करण्यात आला.(Malegaon Deputy Mayor Dispute)