Love Jihad : लव्ह जिहाद व सक्तीच्या धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदने

राज्यभरात ८० हून अधिक ठिकाणी निवेदने सादर

Total Views |
Love Jihad
 
मुंबई : (Love Jihad) महाराष्ट्रभर लव्ह जिहाद व सक्तीच्या धर्मांतराच्या घटनांवर कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी दि. १३ रोजी प्रशासनाला निवेदने देण्याचे राज्यव्यापी आंदोलन पार पडले. मुंबईसह नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर यांसह राज्यातील ८० हून अधिक ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत कार्यालये व पोलिस ठाण्यांमध्ये प्रशासनाला निवेदने सादर करण्यात आली.(Love Jihad)
 
राज्यात वाढत्या कथित धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर कायदा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्य शासनाने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय काढला होता. मात्र, त्यानंतर एक वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कायदेशीर कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विलंबाचा निषेध व्यक्त केला. शासनाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी शासन निर्णयाची प्रत फोटोफ्रेम करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक भेट दिली.(Love Jihad)
 
हेही वाचा : Udgir Religious Remark Case : हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल  
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. राज्यभरातून सुमारे ३,५०० हून अधिक महिलांनी रस्त्यावर उतरून सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आपला आवाज बुलंद केला. आंदोलकांनी आगामी मार्च महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) व सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा मंजूर करण्याची मागणी केली असून, उत्तर प्रदेश व गुजरातप्रमाणे पीडित महिलांना कायदेशीर संरक्षण देणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.(Love Jihad)
 
 
दरम्यान, हे आंदोलन केवळ शासनाला इशारा देण्यासाठी असल्याचे सांगत, आगामी अधिवेशनात ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.(Love Jihad)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.