Udgir Religious Remark Case : हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

13 Feb 2026 17:51:51
Udgir Religious Remark Case
 
मुंबई : (Udgir Religious Remark Case) लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात समाज माध्यमांवर हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने लेखी तक्रार दाखल करण्यात आली. श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी उदगीर पोलीस स्टेशन येथे फिर्याद देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.(Udgir Religious Remark Case)
 
मिळालेल्या माहितीनुसार, कालिदास सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्या व्हिडिओमध्ये हिंदूचे आराध्य देव श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने समाजात तेढ निर्माण होण्याआधीच तक्रार दाखल करत सदर व्यक्तीला अटक करण्याची मागणी करण्यात आली.(Udgir Religious Remark Case)
 
हेही वाचा : Supreme Court Reprimands Dargah Management : महाशिवरात्रीच्या पूजेवरून वाद; सर्वोच्च न्यायालयाने दरगाह व्यवस्थापनाला फटकारले!
 
तक्रारीत दिल्यानुसार सदर व्हिडिओ जाणीवपूर्वक तयार करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ चित्रीकरणावेळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी टाळ्या वाजवून व हसून संबंधित व्यक्तीस प्रोत्साहन दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य आरोपीसह त्याला प्रोत्साहन देणाऱ्या इतर संबंधित व्यक्तींवरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.(Udgir Religious Remark Case)
 
तक्रारीत भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच सोशल मीडियावरून संबंधित व्हिडिओ हटविण्यासाठी तांत्रिक पातळीवर कारवाई करावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.(Udgir Religious Remark Case)
 
Powered By Sangraha 9.0