Navnath Ban : निवडणुकीत मराठी जप करणारे ,संधी आली तेव्हा मुस्लिम महापौर करतात - नवनाथ बन

12 Feb 2026 17:09:24
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठी मराठी करायचं आणि परभणीत उबाठा गटाला महापौर करायची एकमेव संधी मिळाली होती तिथे मुस्लिम महापौर केला हे उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. औरंगजेबाचा अजेंडा पुढे नेण्याचं काम उद्धव ठाकरे करीत आहेत.हे ठाकरेंचं बेगडी धोरण आहे."असे रोखठोक मत भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवार दि.१२ रोजी व्यक्त केले.(Navnath Ban)
 
"संजय राऊत हे राहुल गांधी यांची गुलामगिरी सातत्याने करतात. त्यामुळे भाडखाऊ हा शब्द त्यांच्या तोंडी शोभत नाही. कारण ते स्वतःच तसे आहेत आणि मिस्टर नटवरलाल सारखं त्यांच वागण आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राऊत यांनी सोनिया गांधी यांच्या दावणीला नेऊन बांधले आहेत.भारत आणि अमेरिकेमधील करार हा ताठ मानेने केलेला करार आहे.राऊत यांच्यासारखी गुलामगिरी या करारात नाही." असेही बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.
 
"अजितदादांचा विमान अपघात अतिशय दुर्दैवी आहे. अपघाताची चौकशी केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. स्वतः शरद पवार यांनी त्याच दिवशी सांगितले की हा अपघात आहे.तरीही रोहित पवार आणि संजय राऊत जाणीवपूर्वक खोटे आरोप करीत आहेत. राऊत यांच्याकडे एक फाईलचा कागद असेल तरी त्यांनी तो तपास यंत्रणेकडे द्यावा.त्याची योग्य चौकशी होईल.तसेच अजितदादांकडे भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल होत्या तर त्यांनी त्या कुठेतरी दिल्या असत्या.अजितदादांचे आणि राऊत यांचे काय संबंध होते ते पूर्ण राज्याने बघितले आहेत."असेही बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.
 
हेही वाचा : मुंबईत झेप्टो बनला ‘अलार्म क्लॉक’; डिलिव्हरी पार्टनरच्या तत्परतेमुळे... 
 
"जाणीवपूर्वक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी करण्याच षडयंत्र एका वाहिनीकडून केलं गेल आहे.यात कायदेशीर नोटीस देण्याचं काम मंत्री बावनकुळे यांनी केल आहे. बावनकुळे यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे." असे स्पष्टीकरण बन (Navnath Ban) यांनी दिले.
 
"मुंबई ही सर्व नागरिकांसाठी सुरक्षित आहे. पाटकर फाईल्स मध्ये राऊत यांनी कशा पद्धतीने एका भगिनीला त्रास दिला होता हे देखील मुंबईकरांनी बघितल आहे.त्यामुळेच महापौर अस म्हणाल्या की आम्ही मुंबई महिलांना सुरक्षित करू." असे बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.
 
Powered By Sangraha 9.0