Dharmabhaskar Sadgurudas Maharaj : शिवकथेचा सूर्य अस्ताला

धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज अनंतात विलीन

    12-Feb-2026
Total Views |
Dharmabhaskar Sadgurudas Maharaj
 
मुंबई : (Dharmabhaskar Sadgurudas Maharaj) धर्मभास्कर प. पू. सद्गुरुदास महाराज (Dharmabhaskar Sadgurudas Maharaj) उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.(Dharmabhaskar Sadgurudas Maharaj)
 
संपूर्ण महाराष्ट्रात सद्गुरूदास महाराज (Dharmabhaskar Sadgurudas Maharaj) हे शिवकथाकार म्हणून परिचित होते. त्यांच्या ओजस्वी वाणीतून आणि प्रभावी कथनशैलीने हजारो श्रोत्यांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा मिळाली. त्यांनी आपल्या प्रवचनांमधून कायमच धर्म, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. सद्गुरुदास महाराज हे छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक होते. तसेच गुरुमंदिर परिवाराचा आधारस्तंभ म्हणून त्यांना मानले जात. समाजात मूल्याधिष्ठित कार्याची परंपरा त्यांनी जोपासली.(Dharmabhaskar Sadgurudas Maharaj)
 
स्वतः आजीवन उपासनेच्या मार्गावर राहून अनेक लोकांवर उपासनेचे संस्कार केले. इतकेच नव्हे तर, आचार, विचार व उच्चार यामध्ये एकवाक्यता येण्यासाठी मन, मेंदू व मनगट बळकट असणारा सशक्त व सदाचारी समाज निर्माणासाठी शेकडो शुद्ध उपासना व प्रयोगशील अध्यात्म साधना केंद्रांची निर्मिती केली. मंदिरे ही ऊर्जेची स्थाने असावी या हेतूने भांबेरी, लाखनी, भद्रावती, पवनी, अमरावती, बासर या क्षेत्री मंदिरांची नवनिर्मिती, जिर्णोद्धार करून पुरातन हिंदू मंदिर संस्कृतीचे जतन केले.(Dharmabhaskar Sadgurudas Maharaj)
 
महाराजांचे धर्मकार्य बघून २०२२ मध्ये संकेश्वर पीठाच्या पूज्यपाद शंकराचार्यांनी त्यांना 'धर्मभास्कर' हा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले. याशिवाय प्रबोधरत्न पुरस्कार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, शिवसंत पुरस्कार, मृण्मयी पुरस्कार, विदर्भ गौरव सन्मान, रायगड स्मृती पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार यासारखे अनेक सन्मान महाराजांना प्राप्त झाले आहेत.(Dharmabhaskar Sadgurudas Maharaj)
 
हेही वाचा : Navnath Ban : निवडणुकीत मराठी जप करणारे ,संधी आली तेव्हा मुस्लिम महापौर करतात - नवनाथ बन 
 
सद्गुरुदासजी महाराजांच्या (Dharmabhaskar Sadgurudas Maharaj) अचानक जाण्याचा धक्का हा अतिशय पीडादायक आणि मनामध्ये काळजी उत्पन्न करणारा आहे. विदर्भात शिवकथाकार म्हणून आणि नंतर आध्यात्मिक साधना झाल्यावर सद्गुरूदास महाराज म्हणून समाजामध्ये न्याय, निती, धार्मिकता आणि राष्ट्रभक्ती जागरुक ठेवण्यासाठी प्रबोधनाचे काम करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रगण्य आहे. आपल्या प्रसन्न आणि सरळ स्वभावाने प्रत्येक गोष्टीची बुद्धीनिष्ठ, तर्कनिष्ठ चिकित्सा आणि त्याची सूक्ष्म अनुभूती, याच्या आधारावर त्यांनी पुष्कळ लोकांना या कठीण काळातसुद्धा सन्मार्गी लागण्याची दीक्षा दिली. समाजप्रबोधकांमध्ये त्यांचे एक अग्रगण्य स्थान होते आणि त्यामुळे चांगलेपणा समाजात जागा रहावा आणि वाढावा यासाठी काम करणाऱ्यांना एक चांगला सक्षम आधार असे ते होते. आज त्यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला माझी वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.
- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 
प्रख्यात शिवकथाकार आणि धर्मभास्कर प.पू. सदगुरुदास महाराज (Dharmabhaskar Sadgurudas Maharaj) उपाख्य विजयराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र तळागाळात गेले पाहिजे, यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतित केले. सोपी, रसाळ आणि लोकांना खिळवून ठेवणारी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यातून अनेक तरुणांना आयुष्याची दिशा मिळाली. राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्याचे काम त्यांच्या हातून घडले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि गुरुमंदिर परिवार हा त्यांचा मोठा परिवार होता. अनेक ग्रंथांची, काही नाटकांची निर्मितीही त्यांनी केली. संत साहित्याचाही त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, श्री गुरुचरित्र यावर त्यांचे प्रभुत्त्व होते. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री